जेऊर येथिल भैरवनाथ मंदिरास राज्य शासनाची '' ब '' वर्ग यात्रास्थळ मान्यता

जेऊर येथिल भैरवनाथ मंदिरास राज्य शासनाची '' ब '' वर्ग यात्रास्थळ मान्यता

Published on

00698
जेऊरच्या भैरवनाथ, चिले
महाराज मंदिरास ‘ब’ वर्ग

देवाळे, ता. ९ ः जेऊर (ता. पन्हाळा) येथील श्री भैरवनाथ व सद्गुरु चिले महाराज मंदिरास माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रा स्थळ योजनेतंर्गत ब वर्ग दर्जा प्राप्त झाल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य निरंजन सरवदे यांनी दिली.
शासनाच्या निकष समितीच्या बैठकीत कागदपत्रांची छाननी होऊन मंदिरास ‘ब’ दर्जा मिळाला. भैरवनाथ मंदिर सद्गुरु चिले महाराज यांचे मुख्य शक्तिपीठ असून सद्गुरु चिले महाराजांचे जन्मगाव आहे. त्यामुळे वर्षभर कोल्हापूर, सोलापूर, सातारा, पुणे, रत्नागिरी आधी जिल्ह्यांसह राज्याबाहेरीलही भक्तांची वर्दळ असते. मंदिरात वर्षभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असतात. याची दखल घेत शासनाने मंदिरास ‘ब'' वर्ग दर्जा दिला. त्यामुळे मंदिर व परिसराच्या विविध विकासासाठी शासनाकडून प्रतिवर्षी निधी मिळेल. यातून पायाभूत सुविधा उपलब्ध होतील. ‘ब’ वर्ग समावेशासाठी आमदार डॉ. विनय कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा झाला. यासाठी माजी उपसरपंच डॉ. धोंडिराम पाटील, ग्रामपंचायत सदस्या वैशाली खेतल, कल्पना माने, सजाक्का चिले यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com