Tue, March 21, 2023

धामोड-म्हासुर्ली
मार्गावरील दिशादर्शक चोरीस
धामोड-म्हासुर्ली मार्गावरील दिशादर्शक चोरीस
Published on : 4 February 2023, 4:33 am
धामोड-म्हासुर्ली
मार्गावरील दिशादर्शक चोरीस
धामोड : धामोड-म्हासुर्ली (ता. राधानगरी) या मार्गावरील सहा महिन्यापूर्वी डांबरीकरण झालेल्या बाजारी धनगरवाडा फाटा ते झापाचीवाडी दरम्यानच्या रस्त्यावरील दिशादर्शक फलक चोरीला गेला. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. नव्याने फलक लावावे, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे. धामोड ते मासुर्ली हा दहा किलोमीटरचा मार्ग आहे. या रस्त्यावरती अनेक धोकादायक वळणे आहेत. सहा महिन्यापूर्वी बाजारीचा धनगरवाडा फाटा ते झापाचीवाडी हा दोन किलोमीटर अंतराचा रस्ता पूर्ण झाला आहे. या मार्गावरती लावलेले दिशादर्शक फलक गेल्या आठवड्यात चोरीला गेले आहेत. प्रवासांची गैरसोय टाळण्यासाठी या मार्गावर नव्याने दिशादर्शक बसवावेत, अशी मागणी संजय पाटील यांनी केली आहे.