तुळशीवरील पर्जन्यमापक यंत्र सुरक्षेसाठी नव्याने कुंपण उभारावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुळशीवरील पर्जन्यमापक यंत्र सुरक्षेसाठी नव्याने कुंपण उभारावे
तुळशीवरील पर्जन्यमापक यंत्र सुरक्षेसाठी नव्याने कुंपण उभारावे

तुळशीवरील पर्जन्यमापक यंत्र सुरक्षेसाठी नव्याने कुंपण उभारावे

sakal_logo
By

00894
पर्जन्यमापक यंत्राच्या
संरक्षण कुंपणाची दुरवस्था
धामोड, ता. १० : येथील तुळशी जलाशयावर पर्जन्यमापक यंत्राच्या सुरक्षेसाठी उभारलेल्या संरक्षण कुंपणाची दुरवस्था झाली आहे. तीन वर्षांपूर्वी नव्याने पर्जन्यमापक यंत्र बसवले आहे. मात्र, संरक्षणासाठी उभारलेले लोखंडी कुंपण अखेरच्या घटका मोजत आहे.
तुळशी जलाशयाच्या निर्मितीनंतर १९७८ मध्ये पर्जन्यमापक यंत्राची येथे उभारणी केली. त्यामुळे जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात किती पाऊस पडला याची नेमकी माहिती उपलब्ध होते. येथे बसवण्यात आलेले पर्जन्यमापक यंत्र खराब झाल्याने दैनंदिन पावसाच्या नोंदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते . शासनाने तीन वर्षांपूर्वी नव्याने पर्जन्यमापक यंत्र कार्यान्वित केले आहे. पर्जन्यमापक यंत्राच्या सुरक्षतेसाठी उभारलेल्या संरक्षण कुंपणाची दुरवस्था झाली असून ते पडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे नव्याने संरक्षण कुंपण उभारावे, अशी मागणी रामचंद्र चौगुले यांनी केली आहे.