कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कार्यक्रम
कार्यक्रम

कार्यक्रम

sakal_logo
By

00955
पाटील विद्यालयात विद्यार्थ्यांना निरोप
धामोड : जिद्द, चिकाटी आणि सातत्याच्या जोरावर यश प्राप्त करता येते, असे प्रतिपादन मुख्याध्यापक व्ही. एस. तोरस्कर यांनी केले. ते कोनोली तर्फ असंडोली (ता. राधानगरी) येथे ए. वाय. पाटील माध्यमिक विद्यालयात दहावी विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभप्रसंगी बोलत होते. प्रास्ताविक एम. एस. चांदणे यांनी केले. सरस्वतीपूजन मुख्याध्यापक श्री. तोरस्कर यांच्या हस्ते झाले. मुख्याध्यापक तोरस्कर म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी आयुष्यात पुस्तकांची सोबत करावी. पुस्तकामुळे जीवन समृद्ध होते. पुस्तकामुळे माणसे समजतात.’ सानिया पाटणकर, साक्षी जाधव, समृद्धी पाटील, शुभम पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास एस. व्ही. चरापले, दशरथ कुपले, दिव्या कुपले, रेहान पखाली उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार के. के. जाधव यांनी मानले.