तुळशी धरणावर चौकीदारावर हल्ल्याचा प्रयत्न :गुन्हा दाखल

तुळशी धरणावर चौकीदारावर हल्ल्याचा प्रयत्न :गुन्हा दाखल

तुळशी धरणावर चौकीदारावर
पर्यटकांकडून हल्ल्याचा प्रयत्न
धामोड, ता. २ : येथील तुळशी धरणावर काही मद्यपी पर्यटकांनी चौकीदारावर चाकू फेकून हल्ला केला. हा हल्ला चौकीदाराने चुकविल्याने तो बचावला. याप्रकरणी चौकीदार सुभाष पाटील यांनी राधानगरी पोलिसांत अज्ञातांविरोधात फिर्याद दिली आहे .
याबाबत मिळालेली माहिती अशी, तुळशी धरणावर पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. या ठिकाणी पर्यटक हुल्लडबाजी करतात. परिणामी त्याचा त्रास स्थानिकांसह येथील कर्मचाऱ्यांना देखील सहन करावा लागतो. या ठिकाणी जाण्यासाठी चार मार्ग आहेत. शनिवारी काही हुल्लडबाज पर्यटक धरणाच्या मुख्य गेटवर येऊन मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालत होते. या वेळी या ठिकाणी कार्यरत असणारे चौकीदार सुभाष पाटील यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता एका पर्यटकाने त्यांच्यावर चाकूसारखे शस्त्र फेकत हल्ला केला. या वेळी त्यांनी उडी मारत हल्ला चुकवला. या हल्ल्याबाबत चौकीदार पाटील यांनी राधानगरी पोलिसांत तक्रार दिली आहे. पर्यटकांनी अंगावर फेकलेल शस्त्र पोलिसांनी जप्त केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com