दमदार पावसामुळे धामोड परिसरात शेतीकामांना वेग

दमदार पावसामुळे धामोड परिसरात शेतीकामांना वेग

दमदार पावसामुळे धामोड
परिसरात शेतीकामांना वेग
धामोड, ता. ९ : परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली असून भात शेतीच्या कामांना वेग आला आहे. गेले दोन दिवस पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने येथील शेतकरीवर्ग भाताची रोपे तयार करण्यासाठीच्या कामात गुंतला आहे. दरम्यान, परिसरात भात पिकांची राने तयार करण्याची लगबग सुरू आहे.
दमदार पावसामुळे भात शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. परिसरात चिखल करून भातशेतीची लागण केली जाते. शेतकरी भात शेतीच्या लागणीसाठी आवश्यक असणारी रोपे मृग नक्षत्रात तयार करतो. त्यामुळे सध्य वेगवेगळ्या भाताचे वाण शेतकरी रोप तयार करण्यासाठी शेती सेवा केंद्रातून खरेदी करत आहेत. परिसरात वळवाने हुलकावणी दिल्याने शेतीची कामे खोळंबली होती. दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने नांगरणी, बांध घालणे यांसह शेतीच्या कामाला गती आली आहे. खते, बी-बियाणांचे वाढलेले दर यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com