खरिपाच्या तोंडावर खतांच्या दरात वाढ

खरिपाच्या तोंडावर खतांच्या दरात वाढ

खरिपाच्या तोंडावर खतांच्या दरात वाढ

शेतकरी आर्थिक अडचणीत : कृषी केंद्रांवर खरेदीसाठी गर्दी

सकाळ वृत्तसेवा
धामोड, ता. ९ : ऐन खरिपाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अगोदरच अस्मानी संकटाचा मारा सुरू असतानाच पुन्हा रासायनिक खतांच्या भाववाढीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे. सध्या कृषी सेवा केंद्रांवर रासायनिक खते घेण्यासाठी शेतकऱ्यांची झुंबड उडाली आहे.
राधानगरी तालुक्यात गेल्या आठवड्यापासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने ऊस, भात व इतर पिकांसाठी रासायनिक खतांची आवश्यकता आहे. मात्र, सध्या रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाली आहे. पिकांसाठी लागणारी मिश्र खते, सुपर पोटॅश, अमोनियम सल्फेट या रासायनिक खतांच्या किमतीत १५० ते २०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. सध्या पिकांना डोस देणे आवश्यक असल्याने खताची मागणी वाढली आहे.
खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच वाढलेल्या रासायनिक खतांच्या किमतीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत मोठी वाढ झाली आहे. वाढलेल्या खतांच्या किमतीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून, आर्थिक फटका बसणार आहे . तरीही आवश्यक असणाऱ्या रासायनिक खतांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांचे शेती सेवा केंद्रामध्ये लगबग सुरू आहे.
...
कोट...
गेल्या दोन वर्षांत रासायनिक खतांचे दर वाढले आहेत. खरीप हंगामामुळे रासायनिक खतांना मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कृषी केंद्रांवर रासायनिक खते खरेदीसाठी गर्दी होत असून, शासनाने जाहीर केलेल्या दरापेक्षा वाढीव दर विक्रेते घेत असल्यास कृषी विभागाकडे तक्रार नोंदवावी.
उमेश नाधवडेकर, कृषी सहायक धामोड
...
कोट...
गेल्या दोन वर्षांपासून रासायनिक खतांचे दर वाढत आहेत. पिकांवरती वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागल्याने उत्पादनात घट होत आहे. त्यातच अमोनियम सल्फेट, सुपर पोटॅश, मिश्र खताच्या किमतीत झालेली वाढ परवडणारी नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडत आहे.
दशरथ धनवडे, शेतकरी, धामोड
........
चौकट...

दोन वर्षांतील खतांचे दर

खते - २०२२ - २०२३
अमोनियम सल्फेट - ९०० ११३०
पोटॅश - १४५० १७००
१०: २६ :२६- १४७० १७१०
मिश्र खत - १०५० १२००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com