शेती अवजारे दुरुस्तीस सुतारशाळेत वाढली गर्दी

शेती अवजारे दुरुस्तीस सुतारशाळेत वाढली गर्दी

Published on

1652
धामोड ः येथील सुतार शाळेत अवजारांची दुरुस्ती करणारा कारागीर. (छायाचित्र : केरबा जाधव)
.........

शेती अवजारे दुरुस्तीस
सुतारशाळेत लगबग

धामोड, ता. ३ : येथील परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. शेतीमध्ये यंत्राचा वापर होत असतानाही येथील सुतारशाळेत शेतीसाठी आवश्यक अवजारांच्या दुरुस्तीची लगबग सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सुतारशाळा अवजारांच्या दुरुस्तीसाठी गजबजल्या आहेत.
परिसरात शेतकऱ्यांचा आधुनिक पद्धतीने शेती करण्याकडे कल वाढला आहे. सर्रास यंत्राच्या सहाय्याने शेतकरी शेती करण्यामध्ये गुंतला आहे. तरीही ग्रामीण भागात शेतीसाठी बैलांचा वापर शेतकऱ्यांकडून केला जात आहे. सध्या परिसरामध्ये भात रोपलावणीच्या कामाला वेग आला आहे. कोळपा, खुरप्यांच्या दुरुस्तीचे काम सुतारशाळेत सुरू आहे. पारंपरिक सुतार कागागिरांकडून शेतकरी अवजाराची दुरुस्ती करून घेण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे.
.................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.