केळोशी प्रकल्पावर पर्यटकांची हुल्लडबाजी

केळोशी प्रकल्पावर पर्यटकांची हुल्लडबाजी

Published on

01770

लोंढा नाला प्रकल्प सुरक्षेविनाच
केळोशी बुद्रुकला पर्यटकांची हुल्लडबाजी; प्रशासनाचे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा

धामोड, ता. २६ : राधानगरी तालुक्याच्या पश्चिम परिसरातील केळोशी बुद्रुक (ता. राधानगरी) येथील लोंढा नाला प्रकल्प अल्पावधीतच पर्यटनाचा आकर्षण केंद्रबिंदू ठरला आहे. नयनरम्य परिसर, गर्द वनराई, धरणाचे विहंगम दृश्य यामुळे पर्यटकांचा ओढा वाढत आहे. येथे कर्मचारी नसल्याने सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच काही हुल्लडबाज पर्यटकांचा स्थानिकांना उपद्रव होत आहे. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
राधानगरी तालुक्याच्या पश्चिम परिसरातील केळोशी बुद्रुक (ता. राधानगरी) लोंढा नाला प्रकल्प दोन वर्षांपासून जिल्ह्यातील पर्यटकांचा पिकनिक पॉईंट ठरला आहे. श्रावणात ऊन-पावसाचा खेळ, गर्द वनराई, तुडुंब भरलेल्या प्रकल्पातील पाण्याचे दृश्य यामुळे अल्पावधीतच निसर्गरम्य प्रकल्प पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. धामोड-आपटाळ मुख्य रस्त्याला लागूनच असलेला प्रकल्प तुळशी धरणासाठी वरदान ठरला आहे. प्रकल्पाच्या उजव्या सांडव्यातून तुळशी धरणात जाणारे अतिरिक्त पाणी येथेही पर्यटकांची रेलचेल असते. काही पर्यटक येथे मनमानी करतात. याकडे पाटबंधारे विभागाने सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. प्रकल्पावर पाटबंधारे विभागाचा कर्मचारी नियुक्त केलेला नाही. त्यामुळे येथील सुरक्षा रामभरोसेच आहे. कर्मचारी नसल्याने पर्यटकांची येथे हुल्लडबाजी सुरू आहे. एखादी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोट
पर्यटकांची रेलचेल वर्षा पर्यटनामुळे वाढली आहे. पर्यटकांची हुल्लडबाजी मोठ्या प्रमाणात असते. स्थानिक लोकांना त्याचा त्रास होत आहे. प्रशासनाचे याकडे साफ दुर्लक्ष आहे.
- तानाजी पाटील, केळोशी बुद्रुक, रहिवासी

केळोशी येथील लोंढा नाला प्रकल्पावर अद्याप कर्मचारी नियुक्त केलेला नाही. याबाबत वरिष्ठांना कळवले आहे. शासन स्तरावरून लवकरच निर्णय होईल.
-उदयसिंह स्वामी, शाखा अभियंता, केळोशी प्रकल्प

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com