तुळशी नदीत बेकायदेशीर मासेमारी

तुळशी नदीत बेकायदेशीर मासेमारी
Published on

धामोडला वीजप्रवाह नदीत सोडून मासेमारी
तुळशी नदीपात्रातील बेकायदा प्रकार; कारवाईची गरज

धामोड, ता. २७ : येथील तुळशी नदी पात्रात बेकायदा वीज प्रवाहाने मासेमारी करण्याचे प्रकार सुरू आहेत. चार वर्षांत तुळशी नदीत बेकायदा मासेमारी करताना तिघांना जीवाला मुकावे लागल्याचे उदाहरण आहे. तरीही याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. प्रशासनाने सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. पाटबंधारे विभागाने बेकायदा मासेमारी करणाऱ्यांवर कडक कारवाईची गरज आहे.
तुळशी धरण राधानगरी व करवीर तालुक्यांना वरदान ठरले आहे. तुळशी नदीमुळे ४६ गावांना सिंचनाचा लाभ झाला आहे. धरणामुळे धामोड ते आरे (ता. करवीर) येथे हरितक्रांती अवतरली. दोन वर्षांमध्ये ऑगस्टमध्ये हे धरण पूर्ण क्षमतेने भरले जाते. त्यामुळे पाणीटंचाईचा सामना परिसरातील गावांना करावा लागत नाही .
सध्या तुळशी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. तुळशी नदीतील मासे रुचकर असल्याने जिल्ह्यातून खवय्यांची पहिली पसंती येथील माशाला दिली जाते. पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने तुळशी नदीपात्रात माशासाठी स्थानिक व करवीर तालुक्यातील लोकांकडून बेकायदा मासेमारी केली जाते. नदीशेजारून जाणाऱ्या वीज वाहिनीवरून धोकादायक रीतीने वीजजोडणी करून नदीत वीजप्रवाह सोडला जात आहे. यातून मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जात आहे.
गतवर्षी धामोड पैकी नऊ नंबर येथे तुळशी नदीत अशाच प्रकारे बेकायदा मासेमारी करताना एकाला जीव गमवावा लागला होता. तरीही सध्या तुळशी नदीत बेकायदा मासेमारीला ऊत आला आहे. प्रशासनाचे कडक धोरण अवलंबून कारवाई करण्याची गरज आहे.

कोट
बेकायदा मासेमारी करणे जीवावर बेतणारी बाब आहे. प्रशासनाने याबाबत योग्य कारवाई करण्याची गरज आहे. याबाबत प्रशासनाने कडक धोरण अवलंबावे.
- आनंदा चव्हाण, रहिवासी, धामोड

तुळशी नदीत होत असलेल्या बेकायदा मासेमारीबाबत ग्रामपंचायत व पोलिस ठाण्यात लेखी निवेदन दिले आहे. अशी बेकायदा मासेमारी करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.
- अंजली कारेकर, शाखा अभियंता, तुळशी धरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com