
विद्यार्थ्यांनी रोजगारक्षमता निर्माण करावी
00727
यड्राव : येथे ‘शरद पॉलिटेक्निक’च्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांना एन. सी. गोसावी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अनिल बागणे, बी. एस. ताशीलदार आदी उपस्थित होते.
--------------
विद्यार्थ्यांनी रोजगारक्षमता निर्माण करावी
एन. सी. गोसावी; ‘शरद पॉलिटेक्निक’मध्ये पारितोषिक वितरण
दानोळी, ता. १७ ः देशात रोजगार खूप आहे, पण रोजगारक्षमता असणारे उमेदवार मिळणे अवघड होत चालले आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वत:मध्ये रोजगारक्षमता निर्माण करायला हवी, तरच स्पर्धेच्या युगात आपला टिकाव लागेल. त्यासाठी नवनवीन तांत्रिक आणि संवाद कौशल्ये विकसित करायला पाहिजेत. या गोष्टी आपल्याला जीवनाच्या प्रत्येक टप्यावर आवश्यक असतात, असे प्रतिपादन कोपलॅस्ड कन्सलटंटचे सीईओ एन. सी. गोसावी यांनी केले.
यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पॉलिटेक्निकमध्ये स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभात गोसावी बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे होते. श्री. बागणे म्हणाले, ‘‘समाजात ‘शरद पॅटर्न’ ताठ मानाने उभा आहे. कारण त्यासाठी विद्यार्थी, पालक, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी विश्वास निर्माण केला आहे.’’
प्राचार्य बी. एस. ताशिलदार यांनी वार्षिक अहवाल सादर केला. उत्कृष्ट विद्यार्थी श्रीशैल्य रुग्गे, तर उत्कृष्ट वसतिगृह विद्यार्थी ऋषन कुमार यांचा सन्मान केला.
दरम्यान दोन दिवसांमध्ये पारंपरिकदिन, रेकॉर्ड व पेपर फिशपॉन्ड, फॅशनशो, रांगोळी, मेहंदी, पाककला, सॅलेड डेकोरेशनसह क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, ॲथलेटिक्स, बुद्धिबळ, कॅरम, बॅडमिंटन, टेबलटेनिस विविध क्रीडा स्पर्धा झाल्या. त्यांचे बक्षीस वितरण केले. प्राचार्य बी. एस. ताशिलदार, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. पी. डी. पाटील आदी उपस्थित होते. प्रा. आर. आर. कापसे यांनी सूत्रसंचालन केले. खुशी बोरा यांनी आभार मानले.