Fri, June 9, 2023

दानोळीमध्ये विविध कार्यक्रम
दानोळीमध्ये विविध कार्यक्रम
Published on : 29 March 2023, 3:34 am
दानोळीमध्ये
विविध कार्यक्रम
दानोळी ः येथे भगवान महावीर जन्मकल्याणक महामहोत्वानिमित्त शनिवार (ता. १) ते सोमवार (ता.३) दरम्यान विविध कार्यक्रम होणार आहेत.
शनिवारी सकाळी ध्वजारोहण व श्रमदान होईल. सकाळी ११ वाजता रांगोळी स्पर्धा होणार आहे. सायंकाळी महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम होणार आहे. रविवारी (ता.२) सकाळी ध्वजारोहण व श्रमदान होईल. सकाळी ११ वाजता खुला गटाच्या वक्तृत्व स्पर्धा होतील. सायंकाळी विद्या सिंधु गुरु (नाटीका) होणार आहे. त्यानंतर घोडे, रथ सवाल होतील. सोमवारी (ता.३) सकाळी पंचामृत अभिषेक, जन्मकल्याणिक सोहळा, पूजन हे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. दुपारी तीन वाजता पालखी मिरवणूक निघेल. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षिस वितरण होईल.