निमशिरगाव साहित्य संमेलनाचे पुरस्कार जाहीर

निमशिरगाव साहित्य संमेलनाचे पुरस्कार जाहीर

Published on

00837, 00838,00839
...

निमशिरगाव साहित्य संमेलनाचे पुरस्कार जाहीर

भाई मंत्री, निलम माणगावे, दीपक जोशी यांना पुरस्कार

दानोळी, ता.३ः निमशिरगाव ग्रामस्थ, साहित्य सुधा मंचच्यावतीने प्रतिवर्षी दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची घोषणा आज येथे करण्यात आली. भाई मंत्री (शिरोडा), निलम माणगावे (जयसिंगपूर) आणि दीपक जोशी (पैठण, जि. औरंगाबद) यांना यावर्षी हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या २६ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनामध्ये या पुरस्काराचे वितरण होणार आहे. ही माहिती साहित्यासुधा कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक मंचचे अध्यक्ष पद्माकर पाटील यांनी आज येथे दिली.
गेली २१ वर्षे सामाजिक कार्य, साहित्य, शेती, पाणी, पर्यावरण क्षेत्रातील तीन कार्यकर्त्यांना हे पुरस्कार देण्याची परंपरा आहे. यंदाचा पद्मश्री रत्नाप्पाण्णा कुंभार समाजरत्न पुरस्कार वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा येथील सामाजिक कार्यकर्ते आणि वि. स. खांडेकर यांच्या स्मारकासाठी विशेष योगदान देणारे रघुवीर सीताराम तथा भाई मंत्री यांना देण्यात येणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक पी. बी. पाटील साहित्यरत्न पुरस्कार जयसिंगपूर येथील लेखिका नीलम माणगावे यांना देण्यात येणार आहे. तर कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जाणारा ‘शेतकरी राजा’ पुरस्कार यंदा औरंगाबाद जिल्ह्यातील देगांव येथील दीपक जोशी यांना देण्यात येणार आहे. जोशी यांनी शून्य मशागत तंत्राने कमी खर्चाची शेती विकसित केली आहेत. तसेच आपले तंत्रज्ञान मराठवाड्यातील हजारो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले आहे.
१९ नोव्हेंबर रोजी साहित्य संमेलनामध्ये या पुरस्कारांचे वितरण संमेलनाध्यक्ष रामदास फुटणे, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष कोल्हापूर येथील धन्वंतरी डॉ. विश्वनाथ मगदूम आहेत. एकूण चार सत्रात हे संमेलन होत असून उदघाटन सोहळा, परिसंवाद, कथाकथन आणि नव्या-जुन्या कवींची काव्यमैफल होणार आहे, असेही पद्माकर पाटील यांनी सांगितले. यावेळी पुरस्कार निवड समितीचे सदस्य प्रा. शांताराम कांबळे, रावसाहेब पुजारी, विजयकुमार बेळंके, अजित सुतार व गोमटेश पाटील उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.