दानोळी कुंभोज रस्त्यावर चार चाकीचा अपघात

दानोळी कुंभोज रस्त्यावर चार चाकीचा अपघात
Published on

दानोळी-कुंभोज
रस्त्यावर
मोटारीस अपघात

दानोळी : येथील दानोळी-कुंभोज रस्त्यावर मोटारीचा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटार रस्ता सोडून उसाच्या शेतात सुमारे १०० ते १५० फूट आत जाऊन उलटली. वाहनाचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने चालक व सोबत असणाऱ्यास कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, उसाचे मोठे नुकसान झाले आहे.
येथील दानोळी कुंभोज रस्त्यावर कुंभोजवरून मोटार येत होती. चालक धामणी (जि. सांगली) येथील असून, गावाकडे जात होता. रात्री १२.३० च्या आसपास ही घटना घडली असून उसाच्या शेतात पार्किंग लाईट दिसल्याने काही गावकऱ्यांनी शेतात जाऊन पाहिले तर गाडी शेतात असल्याचे लक्षात आले. यावेळी कोणी येथे नव्हते. नंतर मात्र चालक व त्याच्यासोबत असणारा व्यक्ती चालत पुन्हा गाडीकडे आले. क्रेनच्या साहाय्याने गाडी उचलून बाहेर काढण्यात आली. याची नोंद जयसिंगपूर पोलिस ठाण्यात झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com