
दोघा मेंढपाळास मारहाण: अज्ञात चार जणांवर गुन्हा दाखल
02313, 02312
वळिवडेत दोघा मेंढपाळांना मारहाण
गांधीनगर, ता. १०: शेत तळावर मेंढरे बसवण्यासाठी घेऊन जाताना मेंढरांना लाथा मारल्याचा जाब विचारताना झालेल्या हाणामारीत मेंढपाळ अशोक नागोजी गावडे आणि मारुती विनायक रानगे (दोघे रा गडमुडशिंगी ता करवीर) हे जखमी झाले. मारहाणप्रकरणी चार जणांवर गांधीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ही घटना वळिवडे रेल्वे स्टेशन, झोपडपट्टी परिसरात सायंकाळी घडली.
याबाबत माहिती अशी, अशोक गावडे मेंढरे चारण्यासाठी उचगाव पवार मळ्यात गेला होता. तेथून मेंढरे चारुन सायंकाळी गडमुडशिंगीत राहुल पाटील यांच्या शेततळ्यावर बसवण्यासाठी घेऊन जात होता. वळिवडे रेल्वे स्टेशन झोपडपट्टीजवळ कार्यक्रमास आलेल्या काही तरुणांनी मेंढरांना लाथा मारण्यास सुरुवात केली. त्या युवकांना मेंढपाळाने लाथा का मारता असे विचारताच तेथे जमलेल्या चौघांनी अशोक गावडे आणि मारुती रानगे या दोघांना दगडाने आणि काठीने मारहाण करून जखमी केले. जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. याबाबतची फिर्याद विजय विनायक रानगे (रा गडमुडशिंगी) यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली. याबाबतचा तपास पोलीस नाईक चेतन बोंगाळे करत आहेत.