उचगाव येथे महिला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उचगाव येथे महिला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
उचगाव येथे महिला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

उचगाव येथे महिला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

sakal_logo
By

02413
उचगाव (ता. करवीर) : येथे आयोजित महिला महोत्सवात आमदार ऋतुराज पाटील यांनी मार्गदर्शन केले. या वेळी सरपंच मधुकर चव्हाण, उपसरपंच विराग करी, मान्यवर उपस्थित होते.

कर्तृत्ववान महिलांचा
उचगाव येथे सन्मान
गांधीनगर, ता. २३ : आई, पत्नी, बहिण, मैत्रीण अशा वेगवेगळ्या भूमिका उत्तमरीतीने पार पाडणारी स्त्री हे मल्टी टास्किंगचे उत्तम उदाहरण आहे, असे गौरवोद्गार आमदार ऋतुराज पाटील यांनी काढले. उचगाव (ता. करवीर) ग्रामपंचायततर्फे आयोजित महिला महोत्सवात कर्तृत्ववान महिलांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.
ग्रामपंचायत आणि माजी सदस्या अश्विनी चव्हाण यांच्या पुढाकारातून याचे आयोजन केले होते. अश्विनी चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा आमदार पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला. ग्रामपंचायच्या कर्मचाऱ्यांना नवीन गणवेश प्रदान करण्यात आला.
सरपंच मधुकर चव्हाण म्हणाले, ‘‘आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या माध्यामतून या भागाचा कायापालट झाला आहे.’’
या वेळी उपसरपंच विराग करी, सदस्या शिवानी पाटील, वैजयंती यादव, सारिका माने, सुनिता चव्हाण, सावित्री खांडेकर, नीता हवळ, शीला मोरे, अनुराधा वाईंगडे, मयुरा चव्हाण, सदस्य राहुल मोळे, तुषार पाटील, श्रीधर कदम, संदीप पाटील, अर्जुन शिंदे, सुरज पाटील, कावजी कदम, कीर्ती मसुटे, महेश जाधव, दिनकर पवार, दत्ता यादव, रवी काळे, राजू यादव, दिनकर रेडेकर उपस्थित होते.