त्रेवार्षिक यात्रा काळात वाहतुकीची कोंडी होवू नये याबाबत योग्य ती उपाययोजना करणेबाबत

त्रेवार्षिक यात्रा काळात वाहतुकीची कोंडी होवू नये याबाबत योग्य ती उपाययोजना करणेबाबत

02936
उचगाव, वळिवडे यात्रेसाठी
वाहतुकीचे योग्य नियोजन करा

ठाकरे गट शिवसेनेचे निवेदन

गांधीनगर, ता.४ ः उचगाव आणि वळिवडे (ता. करवीर) येथील त्रैवार्षिक यात्राकाळात वाहतुकीचे नियोजन करावे; असे निवेदन करवीर तालुका शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांनी गांधीनगरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक जाधव यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे, ‘वळिवडेची यात्रा सुरू असून उचगावची यात्रा पुढच्या पंधरवड्यात आहे. या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. उचगाव फाटा, महामार्गावरील उचगांव उड्डाणपूल आणि तावडे हॉटेल उड्डाण पुलाखाली वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी उपाययोजना करावी. प्रसंगी जादा कुमक मागवून वाहतूक कशी सुरळीत होईल यासाठी आपण उपाययोजना करावी.
संबंधित यात्रा कमिटीशी चर्चा करून त्या गावातील पार्किंग व्यवस्था, यात्रेकरूंचे येण्या-जाण्याचे मार्ग, याबाबत माहिती होणे गरजेचे आहे. वळिवडेत शुक्रवारी (ता. ५) व सोमवारी (ता. ८) यात्रेचे मुख्य दिवस. या दिवशी गर्दी होते. उचगावला शुक्रवारी (ता. १९) ते बुधवार (ता. २४) पर्यंत यात्रा आहे. रविवार, बुधवारी गर्दी होण्याची शक्यता असल्याने संबंधित यात्रा समितीशी संपर्क साधुन यावर योग्य ती उपाययोजना केल्यास वाहतुकीची कोंडी होणार नाही. यात्रेकरूंनाही त्रास होणार नाही. वाहतूक व्यवस्थेबाबत सजग असावे.’
यावेळी निरिक्षक दीपक जाधव यांनी संगितले की, वळिवडेत वाहतुकीचे योग्य नियोजन केले आहे. उचगाव येथे यात्रा कमिटी आणि तुमच्या सर्वांच्या सहाय्याने योग्य नियोजन करू.’ यावेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगुले, ग्रामपंचायत सदस्य विराग करी, विभागप्रमुख वीरेंद्र भोपळे, शाखाप्रमुख दीपक अंकल, उपशाखाप्रमुख सुनील पारपानी, अजित चव्हाण, आबा जाधव, किशोर कामरा, गणेश सुतार उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com