राज पाटील यांना ‘किम कॅमेरॉन’ पुरस्कार

राज पाटील यांना ‘किम कॅमेरॉन’ पुरस्कार

Published on

03045
राज पाटील

राज पाटील यांना
‘किम कॅमेरॉन'' पुरस्कार
गांधीनगर, ता. १० : चिंचवाड (ता. करवीर) येथील राज विजयकुमार पाटील यांना डिजिटल आयडेंटिटी अॅडव्हान्समेंट फाउंडेशनकडून किम कॅमेरॉन यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा जागतिक पातळीवरील यावर्षीचा ‘किम कॅमेरॉन अॅवॉर्ड'' हा पुरस्कार देण्यात आला. चिंचवाड येथील राज हे बेंगळुरूमधील हायपरमाईन टेक्नॉलॉजीज या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर आर्किटेक्ट म्हणून काम करतात. या पुरस्कारासाठी राज यांची जगभरातील पाच विजेत्यांमध्ये निवड झाली आहे. या पुरस्काराचा एक भाग म्हणून त्यांना जर्मनीतील बर्लीन येथे युरोपियन आयडेंटिटी अॅन्‍ड क्लाऊड कॉन्फरन्सला उपस्थित राहण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. सध्या राज भारतात डिजिटल आयडेंटिटीवर काम करतात. सॉफ्टवेअर इंजिनिअर्स आणि विविध नामांकित विद्यापीठातील विद्यार्थ्यांना डिजिटल आयडेंटिटीतील नवीन तंत्रज्ञान शिकवतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.