बनावट कागदपत्रांच्या आधारे शेतजमीन विक्री. संशयितांना तीन दिवसांची पोलीस कोठडी. वसगडेतील प्रकार

बनावट कागदपत्रांच्या आधारे शेतजमीन विक्री. संशयितांना तीन दिवसांची पोलीस कोठडी. वसगडेतील प्रकार
Published on: 

दीड कोटींच्या जमिनीचा
पाच कोटींचा बनावट व्यवहार
चौघांना अटक ; गांधीनगर पोलिसांनी केला पर्दापाश

गांधीनगर, ता. ३ ः बनावट कागदपत्रे, शिक्के आणि सह्यांचा वापर करुन दीड कोटींच्या शेतजमिनीचा पाच कोटींना व्यवहार दाखवून शेतजमीन बिगरशेतीसाठी बनावट कागदपत्रे, शिक्के आणि सह्यांचा वापर केल्याचा तपास गांधीनगर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक आकाश जाधव यांनी केला. याप्रकरणी दीपक कुंतीनाथ सौदे (वय ५०), देशभूषण बाळासो चौगुले (वय ५४) (दोघेही वसगडे, ता. करवीर.) राजबक्ष लतिफ शेख (वय ४३, बसवेश्वर पार्क, मदिना कॉलनीजवळ) आणि सचिन श्रीकांत खांडेकर (वय ३५, सरस्वती कॉलनी, चौगुले पार्क, उचगाव) यांना अटक झाली आहे. संशयितांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
याबाबतची माहिती अशी, दीपक सौदे (वय ५० वर्षे, मूळ वसगडे, सध्या रा. सी ४०७, ऑपस ७६, विनोदे वस्ती, वाकड, पुणे) याने आपल्या मालकीची शेतजमीन गट क्र. ११२२/३ मधील ७३ गुंठे जमिनीपैकी, काही क्षेत्र विक्री करताना खरेदी दस्तावेळी सादर केलेला तहसिलदार करवीर यांच्याकडील बिगरशेतीचा बनावट आदेश सही शिक्क्यानिशी तयार केला. बनावट कागदपत्रे तयार करुन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला. तपासात दीपक याने आपली जमिनी देशभूषण याला विकली. त्यानंतर यांनी ही जमिन बिगरशेती करण्यासाठी राजबक्ष आणि सचिन यांना काम दिले. राजबक्ष आणि सचिन यांनी तहसिलदार, भूमापन कार्यालयाचे बनावट शिक्के तयार करुन खोट्या सह्या केल्या. याप्रकरणी मंडल अधिकारी सुरेश यशवंत टिपुगडे (वय ५१ ) यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास पोलिस करत आहेत.
-----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com