गांधीनगर मुख्य रस्त्यावर अतिक्रमण - रहदारीला होतोय अडथळा

गांधीनगर मुख्य रस्त्यावर अतिक्रमण - रहदारीला होतोय अडथळा
Published on: 

04035

गांधीनगर (ता. करवीर) : येथे मुख्य रस्त्यावर दुतर्फा व्यापाऱ्यांनी तयार केलेले अडथळे. त्यामुळे विस्कळीत होणारी वाहतूक.
--
गांधीनगर रस्त्यावर फलकांचा अडथळा
वाहतूक कोंडी; सणांच्या पार्श्वभूमीवर अडथळे दूर करण्याची मागणी

प्रवीण जाधव ः सकाळ वृत्तसेवा
गांधीनगर, ता. ७ ः तावडे हॉटेल ते गांधीनगर मुख्य रस्त्यावर दुकानांचे फलक आणि इतर वस्तूंमुळे मूळ रस्त्यावर अडथळे निर्माण झाले आहेत. दुकानापासून पाच ते २० फुटांपर्यंत साहित्य ठेवल्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने हे अडथळे दूर करून रस्ता मुक्त करावा, अशी ग्राहकांची मागणी होत आहे.
गांधीनगर बाजारपेठ ग्राहक आणि व्यापाऱ्यांच्या वर्दळीमुळे दिवसेंदिवस वाढत आहे. होलसेल व्यापारपेठ म्हणून प्रसिध्दीस बाजारपेठेमध्ये किरकोळ व्यापारही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सणासुदीच्या हंगामाअगोदर येथे होलसेल दुकानांकडे रिटेल व्यापाऱ्यांची वर्दळ सुरू होते. ही गर्दी थांबते तोपर्यंत किरकोळ ग्राहकांची गर्दी या बाजारपेठेत सुरू होते. फक्त सणावेळी असणारी गर्दी वर्षभर सुरू आहे. सर्वधर्मियांच्या सणाला ग्राहकांची गर्दी होते. विवाहाचे मुहूर्त वर्षभर असल्याने ही गर्दी सुरूच राहते. ग्राहक आणि व्यापाऱ्यांच्या वाढत्या गर्दीमुळे दिवसेंदिवस या बाजारपेठेचा आवाका वाढत चालला आहे. तावडे हॉटेलला थांबलेली बाजारपेठ आता चिंचवाडच्या दिशेने वळिवडे आणि रुकडी मार्गे विस्तारत आहे; परंतु मुख्य रस्त्यावर असणाऱ्या व्यापाऱ्यांनी दुकानांसमोर डिजिटल फलक, जाहिरातीच्या वस्तू, बाके आदी साहित्य ठेवल्यामुळे रस्त्यावर अडथळे निर्माण झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी ग्राहक करत आहेत.
-------------------
चौकट -
रस्त्यावरील अडथळे काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे लवकरच मोहिमेचे नियोजन करण्यात येत आहे. रस्त्यावरील अडथळे व्यापाऱ्यांनी स्वतः काढून घेऊन प्रशासनास सहकार्य करावे.
- एस.बी. इंगवले, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, गांधीनगर.
--------------------
दुकानापासून ते मुख्य रस्त्यापर्यंत काही ठिकाणी १५ ते २० फूट अडथळे केलेले आहेत. हे अडथळे कमी झाले, तर वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
- एक ग्राहक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com