पाँलिटेक्निक प्रवेशप्रक्रिया

पाँलिटेक्निक प्रवेशप्रक्रिया

Published on

थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी मुदतवाढ

पॉलिटेक्निक प्रवेशप्रक्रिया : २२ जुलैला गुणवत्ता यादी, ३ ऑगष्टला पहिली यादी

गडहिंग्लज, ता. ११ : तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे पदविका आभियांत्रिकी (पॉलिटेक्निक) थेट व्दितीय वर्ष अभ्यासक्रमाची प्रवेशप्रकिया सुरु आहे. बारावी, आयटीआय, व्होकेशनल उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आॅनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी दुसऱ्यांदा मुदत वाढववली आहे. वीस जुलैअखेर अर्ज करण्याची मुदत आहे. २२ जुलैला कच्ची तर २७ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल. त्यानंतर प्रवेशाच्या तीन फेऱ्या होणार आहेत.
मे महिन्यात बारावीचा निकाल जाहीर झाला. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यानां पॉलिटेक्निकच्या थेट व्दितीय वर्षाला प्रवेश दिला जातो. प्रत्येक संस्थेतील अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेच्या दहा टक्के जागा यासाठी राखीव असतात. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी आॅनलाईन पध्दतीने https://dsd23.dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर हे अर्ज करावयाचे आहेत. विद्यार्थ्यांना विविध दाखले मिळण्यात विलंब होत असल्याने संचालनालयाने मुदत वाढवली आहे. गुरुवार (ता. २०) अखेर ही मुदत आहे. सर्व पॉलिटेक्निक या प्रक्रियेसाठी अर्ज सुविधा केंद्र आहेत. अर्ज सुविधा केंद्रावर जाऊन याच कालावधीत मूळ प्रमाणपत्रे पडताळणी करुन घ्यावयाची आहेत.
कच्च्या गुणवत्ता यादीवर २५ जुलैअखेर हरकत घेण्यासाठी मुदत आहे. २८ जुलैला संकेतस्थळावर प्रत्येक संस्थेतील आरक्षणानुसार जागांचा तपशिल जाहीर होईल. त्यानंतर विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम आणि संस्थेसाठी विकल्प द्यायचे आहेत. पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांना संबधित संस्थेत ३ ते ७ ऑगष्टअखेर हजेरी द्यावयाची आहे. दुसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांनी १८ ते २० ऑगष्ट तर तिसऱ्या यादीसाठी ३० ऑगष्ट ते १ सप्टेंबरअखेर प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. तिसऱ्या फेरीत जागा रिक्त राहिल्यास संस्थास्तरावर शेवटची समुपदेशन फेरी होईल.
...


प्रवेश प्रक्रिया दृष्टीक्षेपात

*फेरी *कालावधी
पहिली विकल्प फेरी*२९ जुलै ते १ ऑगष्ट
पहिली यादी* ३ ऑगष्ट
दुसरी विकल्प फेरी* १० ते १३ ऑगष्ट
दुसरी यादी* १७ ऑगष्ट
तिसरी विकल्प फेरी* २३ ते २७ ऑगष्ट
तिसरी यादी*२९ ऑगष्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.