गणेश मुर्तीचा ट्रेंड बदलतोय

गणेश मुर्तीचा ट्रेंड बदलतोय

Published on

24203
--------------------------------
गणेश मुर्तीचा ट्रेंड बदलतोय
गणेशोत्सव : शाडूचे रंग, रेफ्री, बाळ गणपतीला पसंती वाढली; मुर्तीकारांची कसरत
दीपक कुपन्नावर : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १८ : पारंपारिक कुंभार देईल ती मुर्ती घरी नेण्याची पद्धत कालबाह्य ठरत आहे. भक्तांत गणेशमुर्तीच्या पसंतीबाबत वैविध्यता वाढली आहे. पर्यावरणपुरक शाडूचे रंग, विविध प्रकारचे पोशाख परिधान केलेल्या (रेफ्री) मुर्ती, बाळगणपतीला मागणी वाढली आहे. पसंतीच्या मुर्तीसाठी कलाकारांची कसरत सुरु आहे. पण, दर्जेदार कामासाठी योग्य मोबदला मिळत असल्याने कलाकारातही उत्साह आहे.
आपला पारंपारिक कुंभार देईल ती मुर्ती घरी नेण्याची वर्षानुवर्षांची पंरपरा. पण, गेल्या दशकभरात हे चित्र बदलत चालले आहे. उत्सवाचे स्वरूप वाढल्याने दरवर्षी वैविध्यपूर्ण गणेशमुर्ती आणण्याकडे भक्तांचा ओढा वाढला आहे. त्यामुळे पावसाळा सुरु झाला की घरोघरी यंदा कोणती मुर्ती आणायची याचे नियोजन सुरु होते. यात प्रामुख्याने युवा आणि लहान मुलांचा अधिक पुढाकार पहायला मिळतो आहे. प्रसिद्ध दगडूशेठ, लालबाग, टिटवाळ, महाराजा स्वरुपातील गणेशमुर्तींचा सुमारे दोन दशकांहून अधिक काळ वरचष्मा राहिला.
काही वर्षापासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे भक्ताची संख्या वाढत आहे. प्रदूषण टाळण्यासाठी मातीच्या मुर्तीसह शाडूच्या नैसर्गिक रंगाचा आग्रह केला जात आहे. रेफ्री मुर्तींनाही चांगली मागणी आहे. ग्राहक इंटरनेटवरून मूर्ती निवड करून तशाच मुर्तीसाठी कलाकारांकडे आग्रह धरत आहेत. मूर्तीतील चोखंदळपणा वाढल्याने ट्रेंड बदलल्याचे मुर्तीकार सांगतात. वैविध्यपूर्ण मुर्ती कामासाठी अधिक वेळ खर्ची पडतो. त्यामुळे त्याचा दर वाढतो. पण, त्यासाठी मोबदला देण्याची भक्तांची तयारी असल्याने कलाकारांतही हुरुप आहे.
----------------
इंटरनेटचा परिणाम
भक्तांना विविध प्रकारच्या मुर्ती पाहण्यासाठी इंटरनेटचा मोठा उपयोग होतो आहे. जगभरातील अनेक प्रकारच्या मुर्ती एका क्लिकवर पहायला मिळत असल्याने कलाकाराला ती साकारणे सहज शक्य झाले आहे. विशेषतः लहान मुलांचा अशा मूर्ती निवडण्यासाठी पुढाकार आहे. त्यांच्याच आवडीने मुर्ती करण्याकडे पालकांचाही कल आहे.
------------
नव्या पिढीत वैविध्यपूर्ण मुर्तीची मागणी आहे. घरगुती असो की सार्वजनिक आपली मुर्ती वेगळेपण जपणारी असावी असा अट्टाहास आहे. परिणामी, मुर्तीत नवे ट्रेंड झपाट्याने येत आहेत.
- श्रेयस किरण कुंभार,
युवा मुर्तीकार, गडहिंग्लज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com