तपानंतर मिळाले तीन नियमित शिक्षक

तपानंतर मिळाले तीन नियमित शिक्षक

तपानंतर मिळाले तीन नियमित शिक्षक
पालिका शिक्षण मंडळ : शैक्षणिक कामकाजाला मिळणार गती
दीपक कुपन्नावर : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ४ : येथील पालिका शिक्षण मंडळाकडील काही शाळांतील वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे नियमित शिक्षकांची मागणी होती. या पार्श्वभूमीवर शासनाच्या निवड प्रक्रियेतून तीन नियमित शिक्षक हजर झाले आहेत. तब्बल तपानंतर हे शिक्षक शाळांना मिळाले आहेत. नियमित शिक्षकांमुळे शैक्षणिक कामकाजाला गती मिळणार आहे. त्‍याच पालकांतून स्वागत होत आहे.
साडेचार दशकांपासून दर्जेदार शिक्षण, क्रीडा महोत्सव, अभ्यासिका, शिष्यवृत्तीसाठी वैयक्तिक मार्गदर्शन, विविध शालोपयोगी उपक्रमांमुळे पालिकेच्या शाळांत नेहमीच विद्यार्थ्यांची गर्दी होती. खासकरून सर्वसामान्यांच्‍या मुलांची संख्या यात अधिक असते. पण, दीड दशकात खासगी शाळांमुळे पटसंख्येला ओहोटी लागली होती. सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या येथील पालिका शाळांत पुन्हा विद्यार्थी परतू लागले आहेत. बॅ नाथ पै विद्यालय, काळू मास्तर विद्यालय, दिनकरराव शिंदे विद्यालयाच्या पट संख्येतील वाढ निश्चित आशादायक आहे. साहजिकच उपलब्ध नियमित शिक्षकांची संख्या कमी पडू लागल्याने अध्यापनावर परिणाम होत होता.
त्यामुळे पालिका शाळांत मानधन तत्त्‍वावर शिक्षक घेऊन काम सुरू होते. पण, शैक्षणिक कामकाजाला अधिक गती येण्यासाठी नियमित शिक्षकांची गरज होती. त्यातही काही शिक्षक निवृत्त झाल्यामुळे जागा रिक्त होत्या. सहा महिन्यांपासून शिक्षण विभागातर्फे नवीन शिक्षकांसाठी भरती प्रक्रिया सुरुरू होती. पटसंख्येच्या तुलनेत सहा नियमित शिक्षक शिक्षण मंडळाला मंजूर आहेत. त्यातून मंडळाकडे पाच शिक्षकांची निवड झाली होती. यातील प्रत्यक्षात तीन शिक्षकच हजर झाले आहेत. यापूर्वी २०१२ ला नियमित शिक्षक मिळाले होते. नाथ पै, काळू मास्तर आणि श्रेष्टी विद्यालयात हे नवे शिक्षक हजर झाले आहेत. नियमित शिक्षक हजर झाल्याने विद्यार्थ्यांची सोय झाली आहे. शैक्षणिक कामाकाजाला देखील गती मिळणार असल्याने पालकांतून स्वागत होत आहे.
-------------------
शिक्षण मंडळ दृष्‍टिक्षेपात
एकूण विद्यार्थी- ९८६
नियमित शिक्षक- ३५
मानधन शिक्षक- १०
एकूण शाळा- ६

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com