गुफा गार्डियन्स ठरला बाजीगर

गुफा गार्डियन्स ठरला बाजीगर

89363
गडहिंग्लज : शिवराज युनायटेड डेव्हलपमेंट लीग विजेता गुफा गार्डियन्सला करंडक देताना दिग्विजय कुराडे. सोबत गुंडू पाटील, मल्लिकार्जुन बेल्लद, संभाजी शिवारे, अजीम पठाण, संतोष मांगले आदी. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)
.................
‘गुफा गार्डियन्स’ ठरला बाजीगर

शिवराज युनायटेड डेव्हलपमेंट लीग : इफा लायन्स उपविजेता; श्रेयस-अथर्व तिसरा

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ११ : पूर्वार्धात दोन गोलनी पिछाडीवर असणाऱ्या चुरशीच्या अंतिम फुटबॉल सामन्यात गुफा गार्डियन्सने उत्तरार्धात झुंजार खेळ करून इफा लायन्सला नमवत बाजीगर ठरला. टायब्रेकरमध्ये ६-५ अशा गोलने नमवून विजेतेपदासह रोख ११ हजार रुपये आणि प्रतिष्ठेचा शिवराज युनायटेड डेव्हलपमेंट करंडक पटकावला.
दोन गोल करणारा गार्डियन्सचा विद्याधर धबाले ‘सामनावीर’, तर आर्यन दळवी ‘स्पर्धावीर’ ठरला. श्रेयस-अथर्व वॉरियर्सने युनायटेड रायझिंग स्टार्सवर ४-२ अशी मात करून तिसरा क्रमांक पटकावला. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि शिवराज विद्या संकुलातर्फे गेले सात दिवस ही स्पर्धा एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर सुरू होती.
पूर्वार्धात तब्बल दोन गोलनी पिछाडीवर पडलेल्या गुफा गार्डियन्सने उत्तरार्धात जिगरबाज खेळ करत सामन्याचे फासे उलटवले. इफाच्या आदित्य लाखेने गार्डियन्सच्या बचावफळी आणि गोलरक्षकातील गोंधळाचा फायदा उठवत १४ आणि १७ व्या मिनिटाला दोन धक्कादायक गोल नोंदविले. उत्तरार्धात गार्डियन्सचा हुकमी खेळाडू विद्याधर धबालेने २७ आणि ४० व्या मिनिटाला दोन गोल करून तारणहार ठरला. निर्धारित वेळेत २-२ ही कोंडी फोडण्यासाठी पंचांनी टायब्रेकरचा अवलंब केला. यात इफाच्या सौरभ मोहिते, महेश पोवार, सिद्धार्थ दड्डीकर, तर गार्डियन्सतर्फे विद्याधर धबाले, शुभम कागिनकर, प्रवीण पोवार, सुश्रुत सासने यांनी अचूक गोल करून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. दरम्यान, श्रेयस-अथर्व वॉरियर्सने युनायटेड रायझिंग स्टार्सला ४-२ असे हरवून तिसरा क्रमांक मिळविला.
शिवराज विद्या संकुलचे उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, युनायटेडचे अध्यक्ष मल्लिकार्जुन बेल्लद, गोव्याचे प्रशिक्षक रवी नाटेकर, गुंडू पाटील यांच्याहस्ते विजेत्यांना गौरवित आले. ‘स्पर्धावीर’ म्हणून आर्यन दळवीला सायकल देण्यात आली. समन्वयक रोहित साळुंखे, अनिकेत कोले, पंच ओमकार घुगरी, सागर पोवार, प्रथमेश धबाले, अभिषेक पोवार यांचा सत्कार झाला. स्पर्धा संयोजक दीपक कुपन्नावर यांनी स्पर्धेचा आढावा घेतला. संभाजी शिवारे, अजीम पठाण, संतोष मांगले, सुनील कलाल, रवींद्र मोरे, अरुण पाटील, सुभाष पाटील, ए. एम. हासुरे उपस्थित होते. ललित शिंदे यांनी सूत्रसंचलन केले. महेश सुतार यांनी आभार मानले.
...
चौकट..
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट -
स्पर्धा वीर ः आर्यन दळवी (गार्डियन)
गोलरक्षक ः अथर्व जाधव (इफा)
बचावपटू ः सुशांत देवार्डे (श्रेयस-अथर्व)
मध्यरक्षक ः विद्याधर धबाले (गार्डियन्स)
आघाडीपटू ः सौरभ मोहिते (इफा)
उदयोन्मुख ः आलोक पाटील (श्रेयस-अथर्व)
.......................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com