पॉलिटेक्निक प्रवेशासाठी अंतिम मुदतवाढ

पॉलिटेक्निक प्रवेशासाठी अंतिम मुदतवाढ

Published on

पॉलिटेक्निक प्रवेशासाठी अंतिम मुदतवाढ

१८ जुलैअखेर मुदत; २५ ला गुणवत्ता यादी, प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० : तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे पदविका आभियांत्रिकी (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमाची प्रथम वर्ष प्रवेशप्रकिया सुरू आहे. प्रवेश अर्ज भरण्यासाठी दुसऱ्यांदा अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. ऑनलाईन पद्धतीने १८ जुलैअखेर अर्जासाठी मुदत आहे. कच्ची २० जुलै, तर अंतिम गुणवत्ता यादी २५ जुलैला जाहीर होईल. त्यानंतर प्रवेशाच्या तीन फेऱ्यांचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. राज्यात ३९० संस्थांत सुमारे एक लाख पाच हजार प्रवेश क्षमता आहे. आजअखेर एकूण एक लाख १७ हजार ५०० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत.
दहावीचा ऑनलाईन निकाल २७ मे रोजी जाहीर झाल्यावर तंत्रशिक्षण संचालनालयाने पॉलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया २८ मेपासून सुरू केली. विद्यार्थ्यांनी http://poly24.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावयाचे आहेत. प्रवेश अर्जांची किंमत खुल्या गटासाठी ४००, तर राखीव प्रवर्गासाठी ३०० रुपये आहे. राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित आणि खासगी पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेसाठी एकूण ३१६ अर्ज सुविधा केंद्रे कार्यरत आहेत. विविध दाखले मिळण्यात अडचणी येत असल्याने अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवावी अशी विद्यार्थी आणि पालकांतून मागणी होत होती. त्यानुसार दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे.
कच्ची गुणवत्ता यादी २० जुलैला जाहीर होईल. त्यावर २३ जुलैअखेर हरकती नोंदविण्याची मुदत आहे. २५ जुलैला पक्की यादी लागेल. त्याच दिवशी प्रत्येक संस्थेत प्रवर्गानुसार उपलब्ध जागांचा तपशील जाहीर होणार आहे. त्यानंतर संस्था आणि अभ्यासक्रमासाठी विकल्प भरण्याच्या फेऱ्या, जागावाटप, जागा स्वीकृती आदींचे वेळापत्रक संचालनालयाने जाहीर केले आहे. प्रवेशाच्या एकूण तीन फेऱ्या होणार आहेत. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची पहिली यादी ३१ जुलैला जाहीर होणार आहे. यंदा प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे १० सप्टेंबरपासून शैक्षणिक कामकाज सुरू होणार आहे.
.....
चौकट...
प्रवेश प्रक्रिया दृष्टिक्षेपात
-पहिल्या फेरीसाठी जागांचा तपशील ः २५ जुलै
-विकल्प भरण्याची पहिली फेरी ः २६ ते २९ जुलै
-प्रवेश मिळालेल्यांची पहिली यादी ः ३१ जुलै
-प्रवेश निश्चिती पहिली यादी ः १ ते ६ ऑगस्ट
-दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा ः ७ ऑगस्ट
-विकल्प भरण्याची दुसरी फेरी ः ८ ते १२ ऑगस्ट
-दुसरी यादी ः १४ ऑगष्टस्ट
-दुसरी यादी प्रवेश निश्चिती ः १६ ते २० ऑगस्ट
-तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील ः २१ ऑगस्ट
-विकल्प भरण्याची तिसरी फेरी ः २२ ते २६ ऑगस्ट
-तिसरी यादी ः २८ ऑगस्ट
.....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.