गोडसाखर अध्यक्ष निवड

गोडसाखर अध्यक्ष निवड
Published on

गोडसाखर अध्यक्ष निवडीसाठी
सोमवारी संचालक मंडळाची सभा

गडहिंग्लज, ता. ३० : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याच्या (गोडसाखर) अध्यक्ष निवडीसाठी सोमवारी (ता. ७) दुपारी एक वाजता संचालक मंडळाची खास सभा होणार आहे. कारखान्याच्या सभागृहात प्रादेशिक साखर सहसंचालक गोपाळ मावळे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होईल.
कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्यासह १२ संचालकांनी अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्यावर एकतर्फी कारभाराचा आरोप करून त्यांचे सहीचे अधिकार काढून घेण्यासाठी दिलेल्या पत्रावर मावळे यांनी सहा सप्टेंबरला संचालक मंडळाची सभा बोलावली होती. दरम्यान, दोन सप्टेंबर रोजी डॉ. शहापूरकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतरच्या संचालक मंडळ सभेत हा राजीनामा मंजूर करून साखर सहसंचालक कार्यालयाकडे पाठविला होता. तेथून हा राजीनामा सहकार प्राधिकरणाकडे गेला होता. प्राधिकारणने हा राजीनामा मंजूर करून नवे अध्यक्ष निवडीसाठी परवानगी दिली. त्यानुसार आता सात सप्टेंबर रोजी अध्यक्ष निवड होणार आहे. दरम्यान अध्यक्षपदासाठी प्रकाश चव्हाण, प्रकाश पताडे यांच्या नावाची चर्चा आहे. परंतु, कारखान्यातील सत्तारूढ आघाडीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या निर्णयावरच अध्यक्षपदी कोण विराजमान होणार हे ठरणार आहे. तत्पूर्वी, ते संचालक मंडळाची बैठक घेऊन यावर चर्चा करणार असल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com