किणी हायस्कूलमध्ये पतंग महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किणी हायस्कूलमध्ये पतंग महोत्सव
किणी हायस्कूलमध्ये पतंग महोत्सव

किणी हायस्कूलमध्ये पतंग महोत्सव

sakal_logo
By

07944
किणी : संजय पाटील फौंडेशन व किणी हायस्कूलच्या वतीने आयोजित पतंग महोत्सवाचे उद्‌घाटनप्रसंगी बाळगोंडा पाटील, हंबीरराव पाटील, सुरेखा शिरोटे, रेश्मा मुजावर, वैभव कुंभार आदी.
--------
किणी हायस्कूलमध्ये पतंग महोत्सव
घुणकी: मोबाईलवरील खेळातून मुलांनी बाहेर पडून पतंगाचे गुण अंगीकारावे. ऊन वारा यांच्याशी सामना करताना एका धाग्याच्या साह्याने उंच झेप घेत आकाशात स्थिर डोलत राहायचे हे पतंगाकडून शिकायचे, असे आवाहन किणी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आण्णासाहेब पाटील यांनी केले. किणी (ता. हातकणंगले) येथील संजय पाटील फौंडेशन व किणी हायस्कूलतर्फे आयोजित पतंग महोत्सवात ते बोलत होते. किणी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आण्णासाहेब पाटील, मुख्याध्यापिका एस. बी. शिरोटे, बाळगोंड पाटील, अभय पाटील, रेश्मा मुजावर आदी उपस्थित होते.