अंबप फाट्यावर वाद मिटविण्यासाठी गेलेल्या युवकास मारहाण

अंबप फाट्यावर वाद मिटविण्यासाठी गेलेल्या युवकास मारहाण

Published on

वाद मिटविण्यासाठी
गेलेल्या युवकास मारहाण

घुणकी, ता.९ : अंबप येथील मित्राच्या घराच्या जागेचा वाद मिटवायला गेलेल्या युवकास मारहाण झाल्याने युवक गंभीर जखमी झाला. अविनाश मधुकर भानुसे (वय ३२, रा. घुणकी ता. हातकणंगले) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. अंबप फाट्यावर रविवारी घडलेल्या घटनेची नोंद गुरुवारी वडगाव पोलिसांत झाली.
अंबप येथील जमीर इस्माईल मुल्ला व ईसाक याकूब मुल्ला यांचा घराच्या जागेवरून वाद आहे. रविवारी (ता.५) जमीर मुल्ला हे त्यांचा मित्र अविनाश भानुसे यांच्यासोबत शिरोलीला गेले होते. काम झाल्यावर परत येताना इसाक मुल्ला याने वाद मिटवण्यासाठी जमीरला अंबप फाट्यावर बोलावले. जमीर व अविनाश चारचाकी (एम. एच. ०९ बीबी ७०७१) मधून अंबप फाट्यावर आले. वाद मिटवण्यासाठी चर्चा सुरू असताना अचानक वाद वाढून इसाक व जमीर यांच्यात हाणामारी सुरू झाली. इसाकने लोखंडी एडका जमीरला मारत असताना अविनाश भानुसे सोडवू लागला. लोखंडी एडका अविनाशच्या कानाजवळ व हाताला लागून त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर इसाकने चारचाकीची काच फोडली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.