Sun, March 26, 2023

पाराशर हायस्कूलचे यश
पाराशर हायस्कूलचे यश
Published on : 12 February 2023, 3:11 am
08045
नवे पारगाव : येथील पाराशर हायस्कूलच्या एनएमएमएस परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांसोबत प्राचार्य शशिकांत काटे, मनीषा सिद आदी उपस्थित होते.
----
पाराशर हायस्कूलचे यश
घुणकी : नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील पाराशर हायस्कूलचा एनएमएमएस (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक) परीक्षेचा निकाल ९० टक्के लागल्याची माहिती प्राचार्य शशिकांत काटे यांनी दिली. पाराशर हायस्कुलचे ४१ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ३७ उत्तीर्ण झाले. प्राचार्य शशिकांत काटे, प्रभारी पर्यवेक्षक माणिक कुरुंदवाडे, विभाग प्रमुख मनिषा सिद, सुजाता पाटील, दादासाहेब साठे, शितल मुळीक, धनश्री पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.