
वाठार चौकातील रस्त्याचा प्रश्न मार्गी
08527
वाठार : आमदार डॉ. विनय कोरे यांच्या सुचनेनुसार येथील चौकातील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले.
-------
वाठार चौकातील रस्त्याचा प्रश्न मार्गी
आमदार कोरेंच्या प्रयत्नांना यश; गटर्स, पाण्याचा निचरा प्रश्न कधी सुटणार याकडे लक्ष
घुणकी, ता. २८ : वठार तर्फ वडगाव (ता. हातकणंगले) येथील वडगाव- वारणा सर्कल शेजारील रस्ता दुरुस्तीची जबाबदारी राष्ट्रीय प्राधिकरण की सार्वजनिक बांधकामची. यावरून रस्ता रखडला होता. चौकातील रस्ता आमदार डॉ. विनय कोरे यांच्या सुचनेनुसार झाल्याने वाहनधारकांतून समाधान व्यक्त होत आहे. मात्र येथील गटर्स, पाण्याचा निचऱ्याचा प्रश्न कधी मार्गी लागणार याकडे वाठारवासियांचे लक्ष लागले आहे.
डॉ. विनय कोरे यांच्या वारणानगर येथील जनसंपर्क कार्यालयात राष्ट्रीय प्राधिकरणचे ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर गोविंद बरवा व अधिकारी, सार्वजनिक बांधकामचे हातणंगलेचे अभियंता एस. आर. पाटील व वाठार ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांच्यात बैठक झाली. यावेळी वारणा दूध संघाचे संचालक महेंद्र शिंदे यांनी तक्रारीचा पाढा वाचल्यानंतर डॉ. कोरे यांनी सूचना केल्या होत्या. त्यांच्या सुचनेनुसार वाठार चौकातील डांबरीकरण केले पण उर्वरित समस्यांचे निराकरण झालेले नाही. पावसाळा आला आहे. पाऊस सुरू झाला की पाणी साचत असल्याने त्याचा त्रास नागरिकांना होतो. त्यामुळे सर्व समस्या त्वरित सोडवाव्यात अशी मागणी होत आहे.
---
वाठार चौकातील प्रश्न भारतीय राष्ट्रीय प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी सोडवले नाहीत तर वाठार नागरिकांच्यावतीने लवकरच आंदोलन करणार आहे.
-महेंद्र शिंदे, संचालक, वारणा सहकारी दूध संघ, वारणानगर