शिबिरात १३५ रुग्णांची तपासणी

शिबिरात १३५ रुग्णांची तपासणी

Published on

08639
अंबप: येथील गणेश सहकार समूह आणि ॲस्टर आधार हॉस्पीटल, कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्‍घाटन अमल महाडिक यांनी केले. दिप्ती माने व गणेश सहकार समूहातील पदाधिकारी उपस्थित होते.
------
शिबिरात १३५ रुग्णांची तपासणी
घुणकी : अंबप येथील गणेश सहकार संस्था समूहाने अल्पावधीतच गरुडझेप घेतली असून सभासदांचे हित जोपासले आहे, असे मत माजी आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केले. अंबप येथील गणेश सहकार समूह आणि ॲस्टर आधार हॉस्पीटल, कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य तपासणी शिबिराच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच दिप्ती माने होत्या. शिबिरात रक्तातील साखर, हृदयरोग, मूत्ररोगच्या अनुषंगाने १३५ रुग्णांची तपासणी केली. ‘ॲस्टर आधार’चे डॉ. अजिंक्य दोरकर, विजय सुहासे, राहुल माळी व अन्य सहकाऱ्यांनी तपासणी केली. या शिबिरास वारणाचे संचालक प्रा. प्रदीप तोडकर, सुदाम पाटील आदी उपस्थित होते. गणेश सहकार समूहाचे संस्थापक रामकृष्ण लोकरे यांनी स्वागत केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.