वाठारात  युवकाची  आत्महत्या

वाठारात युवकाची आत्महत्या

Published on

08655
वाठारात तरुणाची गळफासाने आत्महत्या
घुणकी : वाठार तर्फ वडगाव (ता. हातकणंगले) येथे युवकांने गळफास घेवुन आत्महत्या केली. इब्राहिम बाबासो पटाईत (वय २७) असे युवकाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता.३) पहाटेच्या सुमारास घटना घडली.या घटनेची नोंद वडगाव पोलिसात झाली आहे. पोलिसातुन मिळालेली माहिती अशी: वाठार - वडगाव रस्त्याजवळ इब्राहिम आई, वडील,भाऊ यांच्या सह रहात होता. नैराश्यतुन इब्राहिमने राहत्या घराच्या छताच्या हुकास ओढणीने गळफास लावून त्याने आत्महत्या केली. मोसीफ पटाईत यांनी वडगाव पोलिसात घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक भैरव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल रोटीवाले तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.