

09324
किणी : येथील समस्यांचे निराकरण करण्याबाबतचे निवेदन खासदार धैर्यशील माने, वसंत पंदरकर यांना देताना संजय पाटील, ॲड. एन. आर. पाटील आदी.
---
किणी, घुणकीतील समस्यांचे निराकरण करा
खासदार धैर्यशील माने ः प्रकल्प संचालक पंदरकरांसह भेट
सकाळ वृत्तसेवा
घुणकी, ता.२८: पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे सुरू असलेल्या सहापदरीकरणाचे कामात किणी, घुणकीतील शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आदेश खासदार धैर्यशील माने यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांना दिले.
किणी, घुणकी येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी खासदार धैर्यशील माने व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांनी येथे भेट दिली. येथील ग्रामस्थांतर्फे विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी खासदार माने यांनी सूचना केल्या.
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणात किणी, घुणकी येथील समस्या राहिल्या असून वीस वर्षे शेतकऱ्यांना त्रास आणि भुर्दंड सोसावा लागला आहे. सहापदरीकरणात समस्यांचे निराकरण करु, असे आश्वासन लोकप्रतिनिधींसह तत्कालीन अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र सध्याच्या सहापदरीकरणात त्या समस्या कायम असल्याने शेतकरी संतप्त झाले. त्यांनी खासदार धैर्यशील माने यांची भेट घेऊन कैफियत मांडली. याची दखल घेऊन आज सायंकाळी खासदार धैर्यशील माने, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर, मिलींद श्रीराव, नवज्योत गडक, वैभव पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांनी समस्यांमुळे कसे नुकसान होते याचा पाढाच वाचला.
उद्योगपती संजय पाटील, वारणाचे संचालक ॲड. एन. आर. पाटील, अनिल पाटील, माजी सरपंच बाळासाहेब पाटील, उपसरपंच अशोक माळी, ग्रामपंचायत सदस्य रणजित निकम, संताजी माने, डॉ. ए. पी. पाटील आदी उपस्थित होते.
घुणकी ते वारणा नदीचे पुलादरम्यान दोन्ही बाजूला सेवा रस्ता, ओढ्यावर साकव, ठिकठिकाणी पाणी जाण्यासाठी छोटे बोगदे करावेत अशा मागण्या घुणकीतील शेतकऱ्यांनी केल्या. वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाष जाधव, राष्ट्रीय पेयजल योजनेचे अध्यक्ष संभाजी पाटील, नामदेव जाधव, उद्योगपती मोहन मोहिते, ग्रामपंचायत सदस्य विकास जाधव, सुहास शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी खासदार माने यांनी किणी, घुणकीतील शेतकऱ्यांचे समस्यांचे निराकरण करण्याचे आदेश श्री. पंदारकर यांना दिले.
----
भुयारी मार्ग, गटर्सची मागणी
किणी हायस्कूलसमोरील माळी वसाहतीतील शाळेच्या विद्यार्थ्यांना व नागरिकांना येण्या जाण्यासाठी भुयारी मार्ग बांधावा, वाठार ते किणी टोल नाका ते वारणा नदीपर्यंत पाण्याच्या निर्गतीकरणासाठी दोन्ही बाजूला मोठ्या गटर्स बांधाव्यात, महामार्गाच्या दोन्ही बाजूला सेवा रस्ता, शेतीच्या पाईपलाईन नेण्यासाठी टनेल, शेतातील ऊस बाहेर काढण्यासाठी रॅम्प बांधण्यात यावे यासह विविध मागण्यांचे निवेदन दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.