मोटारीने सहाय्यक फौजदारास उडविले

मोटारीने सहाय्यक फौजदारास उडविले

सहायक फौजदारास मोटारीने उडविले
पुणे-बंगळूर महामार्गावरील किणी पथकर नाक्यावरील प्रकार

घुणकी, ता. २ : किणी (ता. हातकणंगले) येथील पुणे-बंगळूर महामार्गावर नियंत्रण सुटलेल्या मोटारीने महामार्ग मदत केंद्राचे सहायक फौजदार गुलाब चौगुले यांना धडक दिली. या धडकेत चौगुले गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर कोल्हापुरात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद पेठवडगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.
याबाबात पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, उजळाईवाडी महामार्ग मदत केंद्राचे सहायक फौजदार गुलाब चौगुले हे मंगळवारी (ता. ३०) सकाळी मोहन माटुंगे, रामचंद्र माळी, विनायक डोंगरे यांच्यासोबत महामार्गाच्या बाजूला लावलेल्या वाहनांवर कारवाई करीत होते. याचवेळी पुण्याकडून आलेल्या मोटार (एमएच १४ सीके १४६३) चे चालक महादेवप्पा निगपा होनट्टी (वय ७४, रा. चिंचवड हवेली, पुणे) यांचा मोटारीवरील ताबा सुटला. ही मोटार अंगावर येत असल्याचे पाहून मोहन माटुंगे, रामचंद्र माळी, विनायक डोंगरे हे आरडाओरडा करीत बाजूला झाले. मात्र, चौगुले यांचे तोंड पथकर नाक्याच्या दिशेला असल्याने त्यांना पाठीमागून मोटारीने जोराची धडक बसली. या धडकेत ते त्याच मोटारीवर उडून पडले. यामुळे त्यांच्या मणक्यास व बरगडीस मार लागून ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी वडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com