प्रा. अण्णासाहेब पाटील यांचे कार्य कौतुकास्पद

प्रा. अण्णासाहेब पाटील यांचे कार्य कौतुकास्पद

10140
तळसंदे : शामराव पाटील शिक्षण संस्थेच्या वसतिगृहाचे उद्‍घाटन करताना डॉ. विनय कोरे. शेजारी प्रा. संभाजी पाटील, प्रा. अण्णासाहेब पाटील, दलितमित्र डॉ. अशोकराव माने, ॲड. राजेंद्र पाटील आदी.
--
प्रा. अण्णासाहेब पाटील यांचे कार्य कौतुकास्पद
आमदार डॉ. विनय कोरे ः शामराव पाटील शिक्षण समूहातील वसतिगृहाचे उदघाटन
सकाळ वृत्तसेवा
घुणकी, ता. ५ : ‘‘तळसंदे येथील शामराव पाटील शिक्षण संस्थेचे प्रमुख व यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाचे प्रा. अण्णासाहेब पाटील यांचे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांनी आजपर्यंत अनेक विद्यार्थी व खेळाडू घडवले,’’ असे प्रतिपादन आमदार डॉ. विनय कोरे यांनी तळसंदे येथे केले.
तळसंदे येथील शामराव पाटील शिक्षण संस्थेच्या वसतिगृहाच्या उद्‌घाटनप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सचिव व शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त प्रा. संभाजी पाटील होते. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सचिव प्रा. संभाजी पाटील म्हणाले, ‘अण्णा पाटील यांच्यासारखं अजातशत्रू व्यक्तिमत्त्व क्वचितच घडतं.’ माजी विद्यार्थी सहायक पोलिस निरीक्षक विक्रम पाटील, ज्योती सूर्यवंशी, पोलिस शिपाई कोमल ढोले, ॲड. प्रतिभा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
जिल्हा परिषद माजी सदस्य डॉ. अशोकराव माने, कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने, वारणा बँकेचे संचालक राजेंद्र माने, जिल्हा परिषद माजी सदस्या मनीषा माने, वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच‌. आर. जाधव आदी उपस्थित होते. श्रीकांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. संभाजी पाटील यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com