डीवायपीकडून टेक्नॉलॉजीचे भांडार विद्यार्थ्यांसाठी खुले

डीवायपीकडून टेक्नॉलॉजीचे भांडार विद्यार्थ्यांसाठी खुले

Published on

डीवायपीकडून टेक्नॉलॉजीचे भांडार
विद्यार्थ्यांसाठी खुले : डॉ. गुप्ता
सकाळ वृत्तसेवा
घुणकी, ता. २ : येणाऱ्या काळात कृषी व तंत्रज्ञान क्षेत्रांत एआय टेक्नॉलॉजीमुळे आमूलाग्र बदल घडणार असून, डॉ. डी. वाय. पाटील समूहाने या टेक्नॉलॉजीचे भांडार विद्यार्थ्यांसाठी खुले केले आहे. याचा परिणाम म्हणून येथील विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी झेप घेतील, असा विश्‍वास तळसंदे (ता. हातकणंगले) डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
डॉ. डी. वाय. पाटील कृषी व तंत्रज्ञान महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती यावेळी दिली. प्राचार्य डॉ. सुहास पाटील उपस्थित होते.
डॉ. गुप्ता म्हणाले, ‘जग आता एआयच्या माध्यमातून क्रांती घडवत असताना डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या कृषी विभागात विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्यातील व परराज्यांतील बहुसंख्य विद्यार्थी येथून शिकून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवत आहेत.’ प्राचार्य डॉ. सुहास पाटील म्हणाले, ‘या कृषी महाविद्यालयात अत्युच्च दर्जाचे शिक्षण मिळाल्याने येथून दरवर्षी आयआयटीसारख्या संस्थेत विद्यार्थी जात आहेत. दरवर्षी अनेक विद्यार्थ्यांची निवड देशाच्या आणि राज्याच्या प्रशासकीय सेवेत होत आहे. सध्या महाविद्यालयाचे २२ विद्यार्थी वेगवेगळ्या देशांत शेतीविषयक आधुनिक शिक्षण घेत आहेत. तर १९ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक मिळाले आहे.’ प्रा. पी. डी. उके, राजेंद्र खानोलकर, अमोल गाताडे, प्रा. योगेश शेटे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.