वाठारच्या प्रणाली पाटीलचे युपीएसी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये क्लासवन ऑफिसरपदी

वाठारच्या प्रणाली पाटीलचे युपीएसी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये क्लासवन ऑफिसरपदी

Published on

प्रणाली पाटील B10251

केंद्रीय सशस्त्र पोलिस दल अधिकारीपदी प्रणाली पाटील
घुणकी, ता.६ : वठार तर्फे वडगांव (ता. हातकणंगले) येथील प्रणाली रमेश पाटील हिची केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या सीएपीएफएसी परीक्षेतून केंद्रीय सशस्त्र पोलिस दलामध्ये क्लासवन ऑफिसरपदी निवड झाली. दुसऱ्या प्रयत्नात तिला यश मिळाले.
परीक्षेचा आज शुक्रवारी निकाल लागला. प्रणालीचे प्राथमिक शिक्षण वाठार येथील जिल्हा परिषदेच्या कन्या विद्या मंदीर, माध्यमिक शिक्षण किणी हायस्कूल किणी, बारावीपर्यतचे शिक्षण कोल्हापुरातील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात झाले. युपीएससीच्या अभ्यासासाठी प्रणालीने पुण्यातील सिध्दी विनायक महाविद्यालयात बी. ए. ची पदवी तर भूगोल विषमयातून एम.ए.ची पदवी सर परशुराम भाऊ महाविद्यालयात घेतली.
किणी हायस्कूलमध्ये असताना विविध क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून युपीएससीतून अधिकारी व्हायचे स्वप्न पाहिले. त्यानुसार पुढील शिक्षण घेतले. आर्थिक स्थिती बेताचीच असल्याने दिल्लीला जाऊन क्लास घेणे शक्य नव्हते. यापुढे पोलिस क्षेत्रात मुलींना आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रणालीने सांगितले.प्रणालीचे वडील रमेश पाटील हे गावोगावी जाऊन घरगुती साहित्याची विक्री करतात. तर आई रुपाली मदत करतात.
------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.