विक्रीकरीता गांजा बाळगल्याप्रकरणी जुने पारगांवात एकावर गुन्हा दाखल ---

विक्रीकरीता गांजा बाळगल्याप्रकरणी जुने पारगांवात एकावर गुन्हा दाखल ---

Published on

विक्रीकरीता गांजा
बाळगल्याप्रकरणी
एकावर गुन्हा दाखल

घुणकी : विक्रीसाठी स्वतःजवळ गांजा बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला असून, दिलीप पंडित पाटील (वय ४१, रा. जुने पारगाव, ता. हातकणंगले) असे संशयिताचे नाव आहे. या घटनेची नोंद वडगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.
वडगाव पोलिसातून मिळालेली माहिती अशी, शुक्रवारी (ता. ५ ) उशिरा जुने पारगाव ग्रामपंचायतीसमोर असणारे दिलीप पंडित पाटील याने राहत्या घरी पोलिसांनी धाड टाकून त्याच्याजवळ बेकायदेशीरपणे एक किलो पाचशे चाळीस ग्रॅम वजनाचा हिरवट रंगाचा पाला, काड्या, फुले व बिया असलेला व सुमारे १८, ५०० रुपये किमतीचा गांजा हा अमली पदार्थ विक्रीकरीता स्वतःकडे आढळला. अमलदार मिलिंद टिळे यांनी फिर्याद नोंदवल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.