मा. राजवर्धन हंबीरराव मोहिते वाढदिवस विशेष....

मा. राजवर्धन हंबीरराव मोहिते वाढदिवस विशेष....
Published on

स्ट्रीप
मा. राजवर्धन हंबीरराव मोहिते वाढदिवस विशेष....
...........
11765
राजवर्धन मोहिते

11763
घुणकी : येथील डाग परिसरातील क्षारपड जमिनीची माहिती आमदार डॉ. विनय कोरे यांना देताना वारणा दूध संघाचे संचालक राजवर्धन मोहिते. शेजारी शेतकरी
.....

11764
तळसंदे : येथील कबड्डी स्पर्धेच्या उद्‍घाटनप्रसंगी वारणा समूहाचे नेते आमदार डॉ. विनय कोरे, आमदार डॉ. अशोकराव माने, वारणा दूध संघाचे संचालक राजवर्धन मोहिते, महेंद्र शिंदे, माजी उपसरपंच मनोहर चव्हाण आदी.
......
विकासाभिमुख नेतृत्व
....
एंट्रो...
घुणकी (ता. हातकणंगले) येथील युवा नेते राजवर्धन हंबीरराव मोहिते यांनी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात दबदबा निर्माण करून गावच्या तसेच हातकणंगले तालुक्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले. माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी सरपंच, वारणा दूध संघाचे संचालकपद अशी विविध पदे भूषविली आहेत. आज (ता. २६) त्यांचा वाढदिवस. त्यानिमित्त...
- केशव कुरणे, उपसरपंच, घुणकी
......
जिल्हा परिषद सदस्य हंबीरराव मोहिते (अण्णा) यांच्या निधनानंतर चिरंजीव राजवर्धन मोहिते (बापू) यांनी त्यांच्या कार्याची सर्व जबाबदारी वयाच्या २३ व्या वर्षी स्वत:च्या खांद्यावर घेतली. राजवर्धन यांनी सर्वांना बरोबर घेऊन सहकारी व शैक्षणिक संस्थांचा व्याप सांभाळण्यास सुरुवात केली.
जिल्हा परिषद निवडणुकीवेळी अतिशय विश्वासाने आमदार डॉ. विनय कोरे यांनी राजवर्धन यांना उमेदवारी दिली व ते प्रचंड मतांनी सर्वात तरुण सदस्य म्हणून विजयी झाले.
राजवर्धन मोहिते यांना आजोबांपासून राजकीय आणि विकासाचा वारसा लाभला आहे. आजोबा लोकनेते (कै.) गणपतराव बाबूराव मोहिते यांना लहानपणापासून राजकारणाची आवड होती. ते गावातील गोरगरिबांच्या अडीअडचणी समजून घेऊन मदत करत होते. त्यांनी गोरगरिबांना सावकारी पाशातून सोडविण्यासाठी गावात छत्रपती शिवाजी विकास सोसायटीची ५ फेब्रुवारी १९४३ ला स्थापन केली. त्यानंतर ते १८ वर्षे सरपंच म्हणून राहिले. त्यांनी गावात कोणावर अन्याय होऊ दिला नाही. गाव विकासाभिमुख होत असतानाच कामानिमित्त कोल्हापूरला गेले असता त्यांचा १९६३ मध्ये अपघाती मृत्यू झाला. तेव्हा हंबीरराव मोहिते २५ वर्षांचे होते. त्यांच्यावर विकासाची सर्व धुरा पडली. सर्वांनी हंबीरराव मोहिते यांना अध्यक्ष करून त्यांच्यावर जबाबदारी टाकली. त्यांनी ती समर्थपणे पेलली. नंतर ते १९६७ मध्ये पंचायत समिती सदस्य व १९७४ मध्ये सरपंच झाले.
हंबीरराव मोहितेंना वडिलांचा वारसा लाभल्याने त्यांनी गरिबांची सेवा करण्याचे व्रत घेतले. हंबीरराव यांचा विकासकामांचा व्याप पाहून तत्कालीन खासदार बाळासाहेब माने यांनी त्यांना वडगाव बाजार समितीचे संचालकपद दिले. त्यांनी २५ वर्षे संचालक व सभापती म्हणूनही काम पाहिले. गरीब शेतकऱ्यांचे व्रत घेत हंबीरराव मोहिते यांनी जोतिर्लिंग पाणीपुरवठा संस्था स्थापन केली. बहुतांश क्षेत्र पाण्याखाली आल्याने हरितक्रांती झाली. सोसायटीत दूध विभाग सुरू होता. त्यावेळी शासनाचे एका गावात एक दूध संस्था रजिस्टर करण्याचे धोरण होते. शासनाला धोरणात बदल करण्यास भाग पाडून जनतेसाठी श्री जोतिर्लिंग सहकारी दूध संस्थेची स्थापना १७ फेब्रुवारी १९७८ रोजी केली. दूध संस्था सुरू झाल्यामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. हंबीरराव मोहिते एवढ्यावर थांबले नाहीत. त्यांनी गावात पतसंस्था असावी म्हणून २७ जानेवारी १९८८ रोजी यशवंत नागरी पतसंस्था स्थापन केली. स्वजलधारा योजनेसाठी स्वत:चे दोन लाख रुपये भरून मंगेशनगर, आंबेडकरनगर, माळवाडीसाठी स्वतंत्र पिण्याच्या पाण्याची सोय केली.
वारणा समूहाचे नेते आमदार डॉ. विनय कोरे यांनी जनसुराज्य शक्ती पक्षातून हंबीरराव मोहिते यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली व ते प्रचंड मतांनी विजयी झाले. गावात अंगणवाडी, आंबेडकरनगरमध्ये सभागृह बांधकाम अशी विकासकामे सुरू असताना हंबीरराव मोहिते यांचे १० डिसेंबर २०१० रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे राजवर्धन मोहिते यांच्यावर जबाबदारी पडली. जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत मोठ्या मताधिक्याने ते विजयी झाले. वडिलांचा वारसा पाठीशी असल्यामुळे गावात आदरयुक्त दबदबा निर्माण करून त्यांनी सर्वांना समजून घेऊन गावाच्या विकासाचा ध्यास घेतला.
२०१२ मध्ये घुणकी ग्रामपंचायत निवडणुकीत राजवर्धन मोहिते यांनी आपले स्वतंत्र जनसेवा पॅनेल करून ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन केली. गावचे सरपंच म्हणून कार्यरत झाले. गावातील सर्व रस्त्यांचे डांबरीकरण केले. स्मशानभूमी, बाजार कट्टा, नदीवरील घाट, विस्तारित ग्रामपंचायत इमारत, गटारी व गल्लीबोळांचे काँक्रिटीकरण केले.
एवढ्यावर न थांबता हर्षवर्धन यांनी गावातील मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी व मुलांना गावातच शाळेची सोय व्हावी यासाठी लोकनेते हंबीररावजी मोहिते आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलची स्थापना करून शिक्षण क्षेत्रात चांगली कामगिरी केली. आमदार डॉ. अशोकराव माने यांच्या हस्ते नवे चावरे (ता. हातकणंगले) येथे नूतन इमारतीचा पायाभरणी समारंभ झाला असून, लवकरच शाळेची भव्य इमारत साकारली जाणार आहे.
२०२२ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्या जनसेवा पॅनेची सत्ता आली. आमदार डॉ. विनय कोरे, खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ. अशोकराव माने यांच्या सहकार्यातून विकासकामांचा धडाका सुरू आहे. त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली जयभवानी विकास सेवा संस्था, ज्योतिर्लिंग सहकारी दूध संस्था, ज्योतिर्लिंग सहकारी पाणीपुरवठा संस्था, गणेश विकास सेवा संस्था, यशवंत नागरी सहकारी पतसंस्था, लोकनेते हंबीररावजी मोहिते आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल या संस्थांनी नावलौकिक प्राप्त केला आहे.
ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, जिल्हा परीषद सदस्य म्हणून काम केले असून वारणा सहकारी दूध संघ, वारणानगर, हातकणंगले तालुका सहकारी सूतगिरणी वाठारचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्याच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
.............
चौकट...
कोरेंचे विश्वासू शिलेदार
२०१७ मध्ये पंचायत समितीची निवडणूक लागली आणि डॉ. विनय कोरे यांनी राजवर्धन मोहिते यांच्या आई सरितादेवी मोहिते (काकी) यांना उमेदवारी दिली. काकी मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. त्यामुळे राजवर्धन मोहिते यांनी आमदार कोरेंचा विश्वास सार्थ करून दाखविला. इतक्यावर ते थांबले नाहीत. जनसुराज्य पक्षाचे ते सदस्य होते. अशातच पंचायत समिती सभापती निवडणूक लागली. अवघे पाच सदस्य असताना राजवर्धन मोहिते यांनी काकींना सभापतिपदी बिनविरोध करून तालुका व जिल्हापातळीवर दबदबा निर्माण केला. आज राजवर्धन मोहिते हातकणंगले तालुक्यात विनय कोरे यांच्या विश्वासू शिलेदारांपैकी एक म्हणून काम पाहत आहेत.
................
(पुरवणी संकलन ः संजय पाटील, घुणकी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com