कणेरीकरांनी जपली सामाजिक बांधिलकी

कणेरीकरांनी जपली सामाजिक बांधिलकी

00705
कणेरी : जाधव कुटुंबीयांकडे मदतीचा धनादेश सुपूर्द करताना ग्रामस्थ.

कणेरीवासीयांनी जपली बांधिलकी
विजेचा धक्क्याने मृत जाधव यांच्या कुटुंबीयांना मदत
सकाळ वृत्तसेवा
गोकुळ शिरगाव, ता. २९ : कणेरी (ता. करवीर) येथील दत्तू पाटील मळ्यामध्ये तलावानजीकच्या विद्युत खांबावर दुरुस्तीवेळी विजेचा धक्का बसून महावितरणचे कामगार यशवंत बाबू जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. महिन्यापूर्वीच त्यांच्या वडिलांचाही मृत्यू झाला. घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले. अशा प्रसंगात पुढाकार घेत कणेरीवासीयांनी कुटुंबीयांना अर्थिक मदत करत हातभार लावला. यशवंत जाधव पंधरा वर्षे कंत्राटी तत्त्वावर कामास होते. सहा महिन्यांपूर्वीच त्यांनी कणेरी येथील पदभार स्वीकारला होता. १४ एप्रिल रोजी त्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. या घटनेची कणेरीत हळहळ व्यक्त झाली. येथील ग्रामस्थांनी जाधव यांच्या कुटुंबासाठी मदत केली पाहिजे या भावनेने गावातून आर्थिक मदत संकलित करायला सुरुवात केली. पाचशे, हजार, अशी रक्कम संकलित होत गेली. गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन व फाउंड्री क्लस्टर गोकुळ शिरगाव यांच्यातर्फे २२ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. तसेच कणेरीतील ग्रामस्थांनी ३६ हजार ३०९ रुपयांची आर्थिक मदत संकलित केली. एकूण ५९ हजार रुपयांची आर्थिक मदत कणेरीतील नागरिक आणि गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीची सारथी संस्था यांच्याकडून देण्यात आली.
या अर्थिक निधीचा धनादेश जाधव यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी कणेरीचे सरपंच निशांत पाटील, पोलिसपाटील संग्राम पाटील, आजी-माजी सैनिक संघटना, कणेरीचे अध्यक्ष कृष्णा कदम, कॅप्टन पंडितराव कदम, कृष्णात पाटील आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com