कोगील खुर्द शाळेस ई-लर्निंग किट वाटप

कोगील खुर्द शाळेस ई-लर्निंग किट वाटप

Published on

00825
कोगील खुर्द (ता. करवीर) : येथील शाळेत ई-लर्निंग सेंटरचे उद्‍घाटन करताना मान्यवर.


कोगील खुर्द शाळेस
ई-लर्निंग किटचे वाटप
गोकुळ शिरगाव, ता. ८ : कोगील खुर्द (ता. करवीर) येथील विद्यामंदिर कोगील खुर्द येथे राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन आणि स्टील अॅथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड यांच्यातर्फे ई-लर्निंग किट देण्यात आले.
जिल्हा परिषद शाळामधील सहभाग वाढावा यासाठी तंत्रज्ञानातून शिक्षण यासाठी हे किट बसवल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक धोंडीराम वायदंडे यांनी दिली. या लर्निंग किटमुळे खेड्यापाड्यातील मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शाळेला सहकार्य केल्याबद्दल घाटगे फाउंडेशनप्रती आभार व्यक्त करण्यात आले. उद्‍घाटनप्रसंगी स्टील अॅथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडचे हिम्मतसिंह असोलिया, शाहू कारखान्याचे संचालक संजय नरके, शाहू दूध संघाचे संचालक युवराज प्रसाद, शाहू कारखान्याचे संचालक शिवाजीराव पाटील, मुख्याध्यापक वायदंडे, शिवानी कानकेकर, रश्‍मी मनुगडे, कोगील खुर्दच्या सरपंच सुरेखा कांबळे, उपसरपंच तानाजी कांबळे, माजी सरपंच लता संकपाळ, मारुती संकपाळ उपस्थित होते. अंकुश कांबळे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.