उपनगरांमध्ये पुढील तीन दिवस पाणीपुरवठा बंद

उपनगरांमध्ये पुढील तीन दिवस पाणीपुरवठा बंद
Published on

उपनगरांसह १३ गावांत तीन दिवस पाणी बंद
सकाळ वृत्तसेवा
गोकुळ शिरगाव, ता. २७ : कोल्हापूर शहराशेजारील गावांसह उपनगरांमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यातर्फे पाणीपुरवठा केला जातो. या पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवर जलदाब आल्यामुळे कागलजवळ मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. त्यामुळे संबंधित उपनगरे, १३ गावांत पाणीपुरवठा २८ ते ३० ऑगस्ट तीन दिवस बंद राहणार आहे.
ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईच्या या समस्येमुळे ग्रामस्थांची गौरसोय होणार आहे. दरम्यान, पाणीपुरवठा सुरळीत आणि व्यवस्थित हाोण्यासाठी महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरण विभागाने पाण्याची जोडणा व्यवस्थित व्हावी, याकरिता प्रयत्न करत असून, गळती काढण्यासाठी १३ गावांमध्ये नळ पाणीपुरवठा योजनेअंतर्गत २८ ते ३० ऑगस्ट पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे उंचगाव, गोकुळ शिरगाव, सरनोबतवाडी, वळीवडे, पाचगाव, कणेरी, गांधीनगर, उजळाईवाडी, गडमुडशिंगी यासह अन्य गावांत पाण्याचा ठणठणाट राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com