उत्पादन वाढल्यास
अर्थकारणाला गती

उत्पादन वाढल्यास अर्थकारणाला गती

02878
कासारवाडा : ऊस पीक स्पर्धेतील प्रथम विजेते पांडुरंग माने यांना गौरविताना आमदार प्रकाश आबिटकर. शेजारी दत्तात्रय उगले, जालिंदर पांगारे, किरण पाटील आदी.

उत्पादन वाढवल्यास
अर्थकारणाला गती
आमदार आबिटकर; ऊस पीक स्पर्धेचे बक्षीस वितरण
गारगोटी, ता. २० : परंपरागत शेतीला गतिमान करून उत्पादन वाढविल्यास अर्थकारणाला गती येईल. यामुळे भुदरगड तालुक्यातील ऊस उत्पादन वाढीसाठी कृषी विभागाचे योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले.
कासारवाडा येथे कृषी विभाग व स्वर्गीय सुशीलादेवी आबिटकर ॲग्रिकल्चर फाउंडेशनतर्फे आयोजित एकरी ६० टन ऊस उत्पादकता वाढ अभियानांतर्गत ऊस पीक स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी ते बोलत होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सदस्य दत्तात्रय उगले, जिल्हा कृषी अधिकारी जालिंदर पांगारे प्रमुख उपस्थित होते. या स्पर्धेत पांडुरंग ज्ञानदेव माने (वाघापूर) यांनी आडसाली एकरी १६२ टन १६ किलो ऊस उत्पादन घेऊन प्रथम क्रमांक पटकाविला. याबद्दल त्यांना रोख २५ हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन आबिटकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी अनुक्रमे द्वितीय क्रमांक विजेते धनाजी महिपती पंडित (शेळोली, १०९ टन), तृतीय क्रमांक भारत बाबासो मुसळे (वाघापूर, ८७.५० टन), उत्तेजनार्थ दत्तात्रय गणपती भेंडवडेकर (तिरवडे, ८२.७१ टन) यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच रेखा बाबसो गोडे (शेळोली), कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राजलक्ष्मी भोसले (पिंपळगाव), सुचिता अनिल गुरव, सुवर्णा पाटील (देऊळवाडी) या महिलांना गौरविण्यात आले.
तालुका कृषी अधिकारी किरण पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सरपंच अशोकराव भांदिगरे, सरपंच सुनीता पाटील, अरविंद पाटील, मंडल अधिकारी नितीन भांडवले, विजय राजूरकर, व्ही. डी. चव्हाण, आर. टी. पाटील आदींसह शेतकरी उपस्थित होते. सुनील डवरी यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com