के. पी. पाटील पॉलिटेक्निकमध्ये पारितोषिक वितरण

के. पी. पाटील पॉलिटेक्निकमध्ये पारितोषिक वितरण

02885
मुदाळ : के. पी. पाटील पॉलिटेक्निकच्या पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी माजी आमदार के. पी. पाटील, रणजित पाटील, विकास पाटील आदी.

के. पी. पाटील पॉलिटेक्निकमध्ये पारितोषिक वितरण
गारगोटी : विद्यार्थ्यांनी खिलाडू वृत्ती व उत्तम कलागुण जोपासावेत, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांनी केले.
मुदाळ (ता. भुदरगड) येथे कॉलेजच्या आठव्या स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. स्पर्धेत मुलांमध्ये जनरल चॅम्पियनशिप इलेक्ट्रिकल विभागाने, तर मुलींमध्ये मेकॅनिकल विभागाने पटकावली.
प्राचार्य एस. पी. मोरे यांनी प्रास्ताविक केले. ‘गोकुळ’चे संचालक रणजित पाटील, संस्थेचे सचिव विकास पाटील, सरपंच राजनंदिनी पाटील, उपसरपंच के. ए. पाटील, उपाध्यक्ष एम. एस. पाटील, पांडुरंग पाटील, दिनकर आडसूळ, संग्राम पाटील, श्री. रणदिवे, एन. एच. पाटील, ए. ए. भडाळे, व्ही. बी. मोरे, ए. बी. चौगले, पी. एस. येलेकर, आर. एम. सुतार, पी. ए. देसाई, सांस्कुतिक विभागप्रमुख एम. व्ही. लोकरे, जिमखानाप्रमुख एस. एस. चोचे उपस्थित होते. ए. जे. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. ए. ए. पाटील यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com