गारगोटी : भुदरगड संघ निकाल

गारगोटी : भुदरगड संघ निकाल

02988

गारगोटी : भुदरगड तालुका संघाच्या निकालानंतर हुतात्मा स्मारकास अभिवादन करताना विजयी उमेदवारांसमवेत अध्यक्ष प्रा. बाळ देसाई.
...

भुदरगड संघात सत्ताधारी आघाडी विजयी

विरोधी आघाडीचा धुव्वा; मात्र संस्था गटात जोरदार टक्कर

गारगोटी, ता. १५ : भुदरगड तालुका शेतकरी सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी सहकारमहर्षी बी. जी. देसाई शेतकरी विकास आघाडीचे सर्वच उमेदवार विजयी झाले. तर विरोधी मुळे महाराज परिवर्तन आघाडीचा दारुण पराभव झाला. मात्र विरोधी आघाडीने संस्था गटातील सत्ताधारी आघाडीच्या उमेदवारांशी जोरदार टक्कर दिली. यामुळे मतमोजणीवेळी उमेदवारांची चांगलीच धाकधूक वाढली होती.
भुदरगड तालुका शेतकरी संघाच्या या निवडणुकीत २१ जागांसाठी दोन आघाडींसह अपक्ष असे ४५ उमेदवार रिंगणात उतरले होते. सत्ताधारी गटातर्फे माजी आमदार के. पी. पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, भाजपचे राहुल देसाई, काँग्रेस व मित्र पक्षांनी एकत्र येत स्वर्गीय बी.जी. देसाई शेतकरी सहकारी आघाडी रिंगणात उतरवली होती. तर विरोधात भाजप नेते नाथाजी पाटील, अलकेश कांदळकर, देवराज बारदेसकर, नंदू शिंदे यांनी मुळे महाराज परिवर्तन आघाडी करून सत्ताधाऱ्यांविरोधात लढत दिली होती. ही निवडणूक माघारीपर्यंत बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला. मात्र जागा वाटपाचा तिढा न सुटल्याने दुरंगी लढत झाली होती.
येथील मौनी विद्यापीठातील तालुका क्रीडा संकुलात सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली. पहिल्यांदा संस्था गटातील मतमोजणी झाली. यात मतदारांनी फुटीर मतदान करून सत्ताधारी आघाडीच्या उमेदवारांचा चांगलाच घाम फोडल्याचे मतमोजणीत स्पष्ट झाले. विरोधी आघाडीचे उमेदवार विलास बेलेकर व रणजीत आडके यांचा निसटता पराभव झाला. मत मोजणीत संस्था व व्यक्ती गटात अनेक सूज्ञ मतदारांनी फुटीर मतदान केल्याचे उघड झाले. तर अनेक मतदारांनी मतपेठ्ठीत चिठ्ठयांचा पाऊस पाडला होता.
व्यक्ती गटातील विजयी उमेदवार व कंसात मते अशी : प्रा. आनंदराव विठ्ठल देसाई (९ हजार ८३०), बाबुराव विष्णू देसाई (९ हजार ५४०), शहाजी शामराव देसाई (९ हजार ४२४), हिंदुराव रामचंद्र पाटील (९ हजार ३७८), नारायण आनंदराव पाटील (९ हजार ४०८ ), शंकर संतू पाटील (९ हजार २२०), कॉ. सम्राट आनंदराव मोरे (९ हजार ३००).
महिला प्रतिनिधी : अनुसया पांडुरंग तळकर (१० हजार ४२०), सई संग्रामसिंह सावंत (९ हजार ८६५). अनुसूचित जाती जमाती : अशोक मारुती यादव (१० हजार ८५०), विमुक्त जाती जमाती : प्रकाश आनंदा कांबळे (१० हजार ६९९ ), इतर मागास प्रतिनिधी : बजरंग गणपती सुतार (१० हजार ७५७ ).
सहायक निबंधक युसुफ शेख यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. निकालानंतर विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी फटाक्याची आतषबाजी करीत गुलालाची उधळण केली.
...
संस्था गटातील विजयी उमेदवार व मते

शामराव रामचंद्र इंदूलकर (३६३), विजय आनंदा कोटकर (३३०), नामदेव कृष्णा देसाई (३३६), शामराव रामराव देसाई (३६६), मानसिंग पांडुरंग पाटील (३६६), मारुती दादू पाटील (३४७), अरुण हरी बेलेकर (३३८), विजयकुमार साताप्पा भांदिगरे (३६५), प्रताप भैरू मेंगाणे (३४७).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com