गारगोटी: आदमापुरात बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गारगोटी: आदमापुरात बंद
गारगोटी: आदमापुरात बंद

गारगोटी: आदमापुरात बंद

sakal_logo
By

03037

आदमापूर : संत बाळूमामा मंदिर परिसरात बंदमुळे जाणवलेला शुकशुकाट.
....

आदमापुरात कडकडीत बंद

गारगोटी, ता. ९ : वादग्रस्त स्टेटस लावून सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांचा निषेध करण्यासाठी व त्यांच्यावर कडक कारवाईच्या मागणीसाठी आदमापूर येथील व्यापाऱ्यांनी शुक्रवारी कडकडीत बंद पाळला. यामुळे संत बाळूमामा मंदिर परिसरात दिवसभर शुकशुकाट होता. सर्व व्यापाऱ्यांनी व्यवहार बंद ठेवून घटनेचा निषेध केला. या बंदमुळे भाविकांची गैरसोय झाली.
मुख्य रस्त्यावरील व मंदिराच्या आवारातील सर्व व्यापाऱ्यांनी सकाळपासूनच दुकाने बंद ठेवली. व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील, अमोल पाटील, किरण मुधोळकर, तानाजी पाटील, नामदेव पाटील, एस. के. पाटील, अमोल पाटील, प्रणव पाटील यांच्यासह दुकानदारांनी बंद शंभर टक्के यशस्वी केला. या बंदचा फटका बाळूमामा दर्शनासाठी आलेल्या भाविकांना बसला.