गारगोटी : सोनारवाडीत कार्यक्रम

गारगोटी : सोनारवाडीत कार्यक्रम

03116
५० हजार लाभार्थ्यांना
आयुष्मान कार्डचे वाटप
प्रा. आबिटकर; सोनारवाडीत कार्ड वाटप कार्यक्रम

गारगोटी, ता. १८ : गरीब कुटुंबात एखाद्याला मोठा आजार असल्यास आर्थिक विवंचनेमुळे त्यांना रुग्णालयात उपचार घेणे शक्य होत नाही. उपचाराचा खर्च पेलता येत नसल्याने रुग्णाची व कुटुंबाची गैरसोय होते. या गरीब कुटुंबातील रुग्णांना केंद्र शासनाच्या आयुष्मान भारत या योजनेच्याअंतर्गत रुग्णालयात मोफत उपचार मिळतात. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यातील ५० हजार लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड वाटप सुरू असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर यांनी दिली.
सोनारवाडी (ता. भुदरगड) येथील लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्ड वाटपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आबिटकर म्हणाले की, ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी घरे, शेती गहाण ठेवावं लागतं. कर्जबाजारी होण्याची वेळ त्यांच्यावर येते. अशावेळी ‘आयुष्मान भारत’ योजना ही वरदान ठरणार असून दारिद्यरेषेखाली जाण्याचे दृष्टचक्र थांबेल.’
यावेळी दौलतराव जाधव, सरपंच ऋषिकेश पाटील, उपसरपंच दिगंबर मानगांवकर, विजय सारंग, मिलिंद ताम्हणकर, ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटील, सागर इंदूलकर, मनिषा ऱ्हाटवळ, शांता कांबळे, पोलीस पाटील हरिदास राणे, संजय इंदूलकर आदी उपस्थित होते. गुरूदास शेणवी यांनी प्रास्ताविक केले. साताप्पा कल्याणकर यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com