गारगोटी : प्रकल्पग्रस्तांना धनादेश वाटप

गारगोटी : प्रकल्पग्रस्तांना धनादेश वाटप
Published on

03196
१८ प्रकल्पग्रस्तांना १ कोटी २६ लाख
आमदार प्रकाश आबिटकर; पडखंबे पाटबंधारे प्रकल्पग्रस्तांना भरपाई

गारगोटी, ता. १७ : भुदरगड तालुक्यातील पडखंबेत जलसंधारण महामंडळाने लघुपाटबंधारे प्रकल्प मंजूर केला आहे. प्रकल्पासाठी जमीन संपादित केलेल्या १८ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना १ कोटी २६ लाख रुपये भरपाई मंजूर केली. या रकमेच्या धनादेशाचे वाटप आमदार प्रकाश आबिटकर व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाले.
आमदार आबिटकर म्हणाले, ‘पडखंबे लघु पाटबंधारे प्रकल्प दहा-पंधरा वर्षापासून निधी व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नामुळे प्रलंबित होता. हा प्रकल्प २०१३ ला रद्द करण्याची शिफारस जलसंधारण महामंडळाकडे केली होती. परंतु प्रकल्प रद्द न करता सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करून तत्कालीन जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यासमवेत घेतलेल्या बैठका व पाठपुराव्यामुळे १४ कोटींची मान्यता मिळाली. प्रकल्पासाठी बाधीत होणाऱ्या जमिनींसाठी भरपाईपोटी ७ कोटी ३० लाख रुपये मंजूर होते. उर्वरित गट नं. २४६ मधील १८ शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी पाठपुरावा करून १ कोटी २६ लाख मंजूर करून घेतले. यावेळी उपविभागीय जलसंधारण अधिकारी अविनाश पदमाळे, कनिष्ठ अभियंता श्री. नेसरकर, आनंदा पाटील, कुंडलिक पाटील, दत्तात्रय पाटील, सुभाष पाटील, प्रकाश भोसले, दिलीप भोसले, बाळासो पाटील आदींसह शेतकरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com