गारगोटी : उड्डाणपूलाला निधी द्या

गारगोटी : उड्डाणपूलाला निधी द्या
Published on

मुदाळतिट्टा उड्डाणपुलाला निधी द्या
प्रकाश आबिटकर : मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

गारगोटी, ता. १८ : गारगोटी- कोल्हापूर व राधानगरी- निपाणी या राज्यमार्गावरील मुदाळतिट्टा येथे वाहतुकीची मोठी कोंडी होते. यामुळे वाहनधारक, नागरिकांचे सतत हाल होतात. त्यामुळे मुदाळतिट्टा येथे उड्डाणपूल बांधण्यासाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार प्रकाश आबिटकर निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे, मुदाळतिट्टा हे राधानगरी, भुदरगड व कागल या तीन तालुक्यांचे मध्यवर्ती ठिकाण आहे. येथून एक किलोमीटर अंतरावर आदमापूर येथे संत बाळूमामांचे देवस्थान आहे. तर दोन राज्यमार्गांच्या मध्यभागी हे ठिकाण आहे. याबरोबरच मोठी व्यापारपेठ, बिद्री सहकारी साखर कारखाना, अनेक शैक्षणिक संस्था या परिसरामध्ये असल्यामुळे येथे सतत वाहनांची वर्दळ असते. संत बाळूमामा मंदिर येथे दर रविवारी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. तर दर अमावस्येला मोठी यात्रा भरते. या यात्रेत राज्यासह परराज्यातून भक्तगण येत असतात. तसेच पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरुन येणारी अवजड वाहने निपाणी-मुदाळतिट्टा-राधानगरीमार्गे कोकणात जातात. यामुळे मोठी अवजड वाहने येथून दररोज ये-जा करतात. गारगोटी-कोल्हापूर हा अत्यंत रहदारी असणारा मार्ग असल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून येथे उड्डाणपुलाची नितांत गरज आहे. यामुळे येथील उड्डाणपुलास तत्काळ मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com