३५ अंगणवाड्यांत मदतनीस भरती

३५ अंगणवाड्यांत मदतनीस भरती

३५ अंगणवाड्यांत मदतनीस भरती

भुदरगड तालुका : ३५ जागांसाठी १८१ अर्ज दाखल

सकाळ वृत्तसेवा
गारगोटी, ता. १० : भुदरगड तालुक्यातील ३५ गावांतील रिक्त अंगणवाडी मदतनीस पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. ३५ मदतनीस पदांसाठी शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल १८१ अर्ज दाखल झाले आहेत. राज्य शासनाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी भुदरगड यांच्यावतीने ही भरती प्रक्रिया होणार आहे.
भुदरगड तालुक्यातील ३५ गावांतील अंगणवाडी मदतनीस पदे रिक्त होती. शासन निर्णयानुसार ही भरती प्रक्रिया सुरू झाली. यानंतर इच्छुक महिलांनी कागदपत्रांची जमवाजमव करून मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले आहेत. याकामी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयात झुंबड उडाली होती.
तालुक्यातील आप्पाचीवाडी, मोरस्करवाडी पाळेवाडी, काळाम्मावाडी, मिणचे बुद्रुकपैकी धनगरवाडा, गिरगावपैकी धनगरवाडा, सावतवाडी, गोतेवाडी, जकीनपेठ, भांडेबांबर, बेडीवपैकी धनगरवाडा, एरंडपेपैकी धनगरवाडा, माडेकरवाडी, पेठशिवापूर, खेतवाडी, रावणवाडी, घावरेवाडी, फगरेवाडी, चोपडेवाडी, गडदूवाडी, खेतलवाडी, तळकरवाडी, मेघोलीपैकी धनगरवाडा, आडे, झित्रेवाडी, मटकरवाडी, शिवाजीनगर, वाण्याचीवाडी, बांगडेवाडी, कोल्हेवाडी, कुडतरवाडी, मांगलेवाडी, सुतारवाडी, तिरवडे या ३५ गावांतील अंगणवाडीत ही मदतनीस भरती होणार आहे. येथून इच्छुकांचे अर्ज मागविले होते. यामुळे अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत १८१ अर्ज दाखल झाले. शैक्षणिक अर्हता व शासनाच्या निकषांनुसार ही भरती प्रक्रिया होणार असल्याची माहिती, बालप्रकल्प अधिकारी शीतल पाटील यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com